Mumbai Water Supply : मुंबईमधील ‘वडाळा,शीव आदी भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा

80
Mumbai Water Supply : मुंबईमधील 'वडाळा,शीव आदी भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा
Mumbai Water Supply : मुंबईमधील 'वडाळा,शीव आदी भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे आणि तलाव तुडुंब भरली असली मुंबईकरांची तहान भागवण्या इतपत जल साठा जमा झाला असला तरी प्रत्यक्षात वडाळा (Wadala),शीव (सायन) भागात अनेक ठिकाणी कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. (Mumbai Water Supply)
शीव , अँटॉप भागातील कोकरी आगार, इंदिरानगर, नेहरू नगर, रावळी कॅम्प, जय महाराष्ट्र नगर, म्हाडा कॉलनी, भारतीय कमला नगर, शांती नगर अशा विविध विभागांमध्ये ५० टक्क्यांच्यावर पाणी कपात चालू असून, काही विभागात दुषित पाणी देखील येत आहे. (Mumbai Water Supply)
याबाबत मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांना पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजा यांनी आपल्या पत्रात, मुंबईतील सातही धरणे जवळपास १०० टक्के भरली आहेत, असे बऱ्याच वृर्तमानपत्रामध्ये असे जाहिर करण्यात आले आहे. असे असताना देखील मी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या प्रभाग आपुरा आणि कमी दाबाने तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रभाग क्रमांक १७६ मध्ये  मुंबईमधील धरणे ही १०० टक्के भरलेली असूनही, पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे या विभागातील लोकांना खूपच गैरसोय व नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Mumbai Water Supply)
 रावळी जलाशयामध्ये पाणी पूर्ण क्षमतेने येत नाही. सद्यः स्थितीत नवरात्र उत्सव सुरु आहे आणि दिवाळी सण तोंडावर आला आहे पण लोकांना पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. ही बाब गंभीर असून, याबाबत आपण स्वतः लक्ष घालून ‘एफ उत्तर’ विभागातील लोकांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे, अशी सूचना केली आहे. (Mumbai Water Supply)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.