- विशेष प्रतिनिधी, मुंबई
भातसा (Bhatsa) जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ३ ते ४ दिवसांमध्ये सातत्याने पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबर २०२४ पासून नदीपात्रात गढूळ पाणी जमा होऊ लागले आहे. परिणामी, मुंबईतील (Mumbai) पूर्व उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पाण्यातील ही गढूळता कमी करण्यासाठी महानगरपालिका जल अभियंता (hydraulic engineer) विभागामार्फत जलशुद्धीकरण (Water purification) केंद्रामध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी)
मुंबईतील नागरिकांना सात जलस्त्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या जलस्त्रोतापैकी भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ३ ते ४ दिवसांत जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याची गढूळता २१ ऑक्टोबर २०२४ पासून वाढली आहे, असे निदर्शनास आले आहे.
(हेही वाचा – Assembly Election : शेकापचा मविआला बाय बाय; रायगड जिल्ह्यासह सांगोल्यात होणार परिणाम; 5 उमेदवार केले जाहीर)
मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ (muddy) पाणीपुरवठा (water supply) होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत. पाण्यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे. या बाबी लक्षात घेता, नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्त झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community