Mumbai Water Supply : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या पाणी दरात वाढ होणार?

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलअभियंता विभागाच्या खर्चात तब्बल ४४ टक्क्यांनी वाढ झाली असून या खर्चात वाढ होऊनही मुंबईच्या पाणी पट्टीत केवळ ३८ पैशांनी वाढ करण्यास अद्यापही परवानगी मिळत नाही.

213
Mumbai Water Supply : मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल इतकेच पाणी

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलअभियंता विभागाच्या खर्चात तब्बल ४४ टक्क्यांनी वाढ झाली असून या खर्चात वाढ होऊनही मुंबईच्या पाणी पट्टीत केवळ ३८ पैशांनी वाढ करण्यास अद्यापही परवानगी मिळत नाही. त्यामुळे जून महिन्यांपासून ही वाढ अपेक्षित असताना याला मंजुरी मिळाली नसल्याने येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शुल्क वाढ दिली जाणार की पुन्हा एकदा याला विरोध होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Mumbai Water Supply)

मुंबईतील घरगुती व बिगर घरगुती वापराच्या पाणी दरात दरवर्षी जून महिन्यात ८ टक्के पाणी दरात वाढ केली जाते. त्यानुसार जून महिन्यात पाणीपट्टी दरात ८ टक्क्यांनी वाढ केली जात असून यावर्षी जून महिन्यात या दरवाढीला विरोध झाल्यानंतर याची प्रत्यक्ष आकारणी होऊ शकलेली नाही. परंतु आता या पाणीपट्टी दरात जून महिन्यापासून वाढ केलेल्या पाण्याचे पूर्वलक्षी प्रभावाने पैसे वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. (Mumbai Water Supply)

महापालिका जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सन २०२१-२२ मध्ये आस्थापना, प्रशासकीय, विद्युत वापर, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पट्टी तसेच इतर देखभाल आदींवर खर्च ११०७.३५ कोटी रुपये एवढे होते, तर सन २०२२-२३ मध्ये हा खर्च १६०१.७२ कोटी रुपये एवढा झाला होता. त्यामुळे या दोन वर्षातील खर्चातच आता ४४ टक्के वाढ झाली असून जून २०२३ पासून साडेनऊ महिन्याच्या कालावधीत १०३.४३ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Mumbai Water Supply)

(हेही वाचा – Jogeshwari Vikhroli Metro Line : मेट्रो मार्गिकेचा अडसर दूर: ४५ बांधकामांवर कारवाई)

  • घरगुती ग्राहक (झोपडपट्टी वस्ती)

सध्या दर : ४.७६ रुपये अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार

प्रस्तावित दर : ५.१४ अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार (Mumbai Water Supply)

  • घरगुती ग्राहक (ज्या झोपडपट्टींमध्ये शोषण टाकी व देखभाल महापालिका करते)

सध्या दर : ५. २८ रुपये अधिक ७० टक्के मलनिःसारण आकार

प्रस्तावित दर : ५.७० अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार (Mumbai Water Supply)

  • इमारत, बंगले व इतर घरगुती ग्राहक

सध्या दर : ६.३६ रुपये अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार

प्रस्तावित दर ६.८७ अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार (Mumbai Water Supply)

  • बिगर व्यापारी संस्था

सध्या दर: २५.४६ रुपये अधिक ७० टक्के मलनिःसारण आकार

प्रस्तावित दर २७.५० अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार (Mumbai Water Supply)

  • व्यावसायिक संस्था

सध्या दर : ४७.७५ रुपये अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार

प्रस्तावित दर : ५१.५७ अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार (Mumbai Water Supply)

  • व्यावसायिक संस्था, उद्योगधंदे, कारखाने व इतर

सध्या दर : ६३.६५ रुपये अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार

प्रस्तावित दर : ६८.७४ अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार (Mumbai Water Supply)

  • रेसकोर्स आणि तीन व त्याहून अधिक तारांकित हॉटेल्स

सध्या दर : ९५.४९ रुपये अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार

प्रस्तावित दर : १०३.१३ अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार (Mumbai Water Supply)

  • बॉटलीग प्लांट, एअरेटेड पाण्याचे उत्पादन इत्यादी

सध्या दर : १३४.६४ रुपये अधिक ७० टक्के मलनिःसारण आकार

प्रस्तावित दर : १४३.२५ अधिक ७० टक्के मलनि:सारण आकार (Mumbai Water Supply)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.