Mumbai Weather : मुंबई धुक्यात हरवली; हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट

54
Mumbai Weather : मुंबई धुक्यात हरवली; हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट
Mumbai Weather : मुंबई धुक्यात हरवली; हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट

मुंबईत (Mumbai Weather ) गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झालेला पाहायला मिळत आहेत. पश्चिमी प्रकोपामुळे आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण, मंदावलेला वाऱ्याचा वेग, हवेत साचलेली प्रदूषके यामुळे मुंबईमध्ये गुरुवारी दिवसभर धुक्याची चादर पाहायला मिळाली. दुपारनंतर धुरक्याची चादर अधिक गडद झाली आणि अवघ्या काही अंतरावरच्या इमारती धुरक्यामध्ये अदृश्य झाल्याचे चित्र होते. (Mumbai Weather )

दृश्यमानतेवरही परिणाम
दाट धुरक्याची चादर दिसत असताना, केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या (Central Pollution Control Board) ॲपवर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १६० ते १७० दरम्यान म्हणजे मध्यम श्रेणीत दिसत होता. काही खासगी ॲपवर ही आकडेवारी आरोग्यासाठी घातक (air pollution) अशीही नोंदली गेली. परळ, लोअर परळ, भायखळा या भागांमध्ये दाट धुरके दिसत असताना दुपारी ३च्या सुमारास भायखळ्याची हवेची गुणवत्ता १३० म्हणजे मध्यम श्रेणीत नोंदली गेली. संध्याकाळच्या सुमारास हा निर्देशांक १४४ होता. कुलाबा येथील केंद्रावरही हवा गुणवत्ता निर्देशांक दुपारी १०३, तर संध्याकाळी ७च्या सुमारास ११३ होता. मात्र, आझाद मैदान, ओव्हल मैदान येथून समोरच्या इमारतीही दिसत नव्हत्या. (Mumbai Weather )

धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत
पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे विकास प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Mumbai Weather )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.