गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता बरसायला सुरुवात केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात धुमाकूळ घातल्यानंतर आता मुंबईत (Mumbai Heavy rain) तुफान पाऊस सुरू झाला आहे. परिणामी कार्यालयीन कामे संपून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले आहेत. (Mumbai Weather Update)
संध्याकाळी ७च्या दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील सेवा (Central Local Railway Disrupted) विस्कळीत झाली. गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर जलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने असून स्लो मार्गावरील लोकल ५ ते ६ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुडं येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूकीवरही परिणाम झाला आहे.
हवामान विभागाने बुधवारी दुपारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) आणि रायगडसाठी रेड अलर्ट दिला होता. मात्र आता मुंबईतील पावसाची परिस्थिती पाहून गुरूवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित केला आहे. दरम्यान, बुधवारी हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट (Mumbai Yellow Alert) जारी केला आहे. ठाणे आणि पालघरसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. (Mumbai Weather Update)
(हाही वाचा – IMS Rollout मुळे रिटेलर्सच्या सणासुदीच्या काळातील विक्रीच्या संधी होऊ शकतात कमी : Empower India)
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे शहरांत पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले असून वाहनचालकांची गैरसोय झाली आहे. भांडूप, मुलुंडसह घाटकोपर, कांजुरमार्ग, पवई, एलबीस रोड भागाला पावसाने झोडपून काढले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community