देशाच्या आर्थिक राजधानीत रोज रात्री तब्बल दीड लाख लोकांना झोपण्यासाठी जागा मिळत नाही. दर 1 लाख लोकसंख्येमागे एक निवारागृह असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही पायदळी तुडवला जात आहे. एक लाखाला एक निवारागृहाची गरज असताना, प्रत्यक्षात फक्त 23 निवराागृहे आहेत.
महापालिकेच्या लेखी मुंबईतील बेघरांचा आकडा 54 हजार 416 आहे. प्रत्यक्षात मात्र सेंटर फाॅर प्रमोटिंग डेमोक्रसी संस्थेच्या मते दीड लाख बेघर आहेत. त्यांना फूटपाथ, पूल, मंदिर, स्टेशन अशा ठिकाणी जिथे जागा मिळेल तिथे ऊन, थंडी, पावसात आडोसा शोधावा लागतो. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रश्न सुटत नाही. महापालिकेने 2010 ते 2020 या दहा वर्षांत फक्त 23 निवारे चालवले जात आहेत. या निवारगृहांत राहत असलेल्या बेघरांचा आकडा एक हजारांच्याही वर जात नाही. यावरुन बेघरांची अवस्था लक्षात द्यावी.
( हेही वाचा: कोळीवाड्यांच्या जागेवर SRA होणार नाहीच, कोळीवाड्यांना वाढीव FSI देणार – उपमुख्यमंत्री )