मुंबईत उभारणार आणखी पाच अग्निशमन केंद्रे

196
मुंबईत उभारणार आणखी पाच अग्निशमन केंद्रे
मुंबईत उभारणार आणखी पाच अग्निशमन केंद्रे

मुंबई शहर आणि उपनगरात अरुंद जागेत टोलेजंग इमारती बांधण्यात आल्या आहेत. कोणत्याही आराखड्याशिवाय आणि लिखित परवानगी शिवाय रेल्वे रुळांच्या बाजूला, डोंगरावर घरे बांधण्यात आली आहेत. निष्काळजीपणामुळे, सदोष वायरींगमुळे घरांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. २०२३च्या पहिल्या दोन महिन्यांत आग लागण्याच्या एकूण ७५० घटनांची नोंद करण्यात आली आहे. आग लागण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ आणि अग्निशमन केंद्रांच्या कमतरेतेला लक्षात घेऊन नवीन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये शहरातल्या एकूण पाच ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यात येणार आहेत.

‘या’ पाच ठिकाणी बांधणार नवे केंद्र

१. कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज
२. कांजुरमार्ग पश्चिमेकडील एल. बी. एस मार्ग
३. सांताक्रुझ पश्चिमेकडील जुहू तारा रोड
४. चेंबूरमधील माहुल रोड
५. अंधेरी पश्चिमेकडील आंबोली

(हेही वाचा – मरोशी ते सहार दरम्यानच्या ९० वर्षांपूर्वीच्या दोन्ही तानसा जलवाहिनी काढून टाकणार…)

सद्य स्थिती काय?

मुंबई महानगर पालिकेच्या २०२२-२०२३ आणि २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पांमध्ये नव्या अग्निशमन केंद्रांसाठी विशेष तरतूद करण्यात आली होती. त्यांच्या बांधकामाची जबाबदारी नगर अभियंता विभागाकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत यातील एकही केंद्र कार्यान्वित झालेले नाही. कांदिवलीतील केंद्र २०२३च्या अखेरीस सुरू होईल. भांडुपच्या जवळ असणारे केंद्र दोन वर्षांत पूर्ण होणाार आहे. त्याचे पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. तर नाल्याचा काही भागमध्ये येत असल्यामुळे सांताक्रुझचा केंद्राचे काम अडकून पडले आहे. अडीच वर्षांत सेवेत दाखल होणारे हे केंद्र सध्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. पूर्वी निश्चित केलेल्या जागेत १२८ झाडे असल्यामुळे चेंबूरमधील केंद्र निश्चित केलेल्या जागेच्या जरा दूर बांधण्यात येणार आहे. झाडे न तोडण्याच्या निर्णयामुळे एकूण प्रक्रियेला वेळापत्रकापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. अंधेरीतल्या केंद्राची कागदोपत्री प्रक्रिया आता सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.