मुंबईत १५ वर्षांवरील २२ रुग्णांना गोवरची बाधा

131

गेल्या वर्षाच्या अखेरीला मुंबईत गोवरचा उद्रेक होताच, लसीकरण मोहिम दोन वर्षांत झाली नसल्याची टीका आरोग्य विभागावर झाली होती. मात्र पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीत १५ वर्षांपुढील २२ रुग्णांना गोवरची बाधा झाल्याचे आढळले. पालिका अधिका-यांच्या चौकशीत या २२ रुग्णांच्या लसीकरणाच्या माहितीबाबत खुद्द पालकांमध्येच संदिग्धता आहे. ब-याच पालकांनी गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण दिल्याचे आठवत नाहीये तर कित्येक पालकांनी आपल्या मुलाला लसीकरण दिले नसल्याची कबुली दिली.

राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान मुंबई गोवरचे हॉटस्पॉट ठरले. मुंबईपाठोपाठ राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ लागला. मुंबईतील गोवरच्या उद्रेकाची दखल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानेही घेतली. केंद्राचे पथकही मुंबईतील गोवंडी येथील गोवर उद्रेक झालेल्या ठिकाणी तसेच इतर भागांत केंद्रीय पथक तीन दिवसांच्या दौ-यावर होते. मुंबईत गोवरची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये लसीकरण झालेच नसल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रीय पथकाच्या भेटीतून उघडकीस आला.

अंधश्रध्देमुळेच लसीकरण नाकारले जाते

पालिका आरोग्य विभागाच्या नोंदीतील ५६५ रुग्णापैकी १५६ रुग्ण पाच वर्षांपुढील आहे. ५६५ रुग्णांमध्ये वीस वयोगटापुढील रुग्णही सापडल्याची कबुली पालिका अधिका-यांनी दिली. लसीकरण न झालेल्या वयोगटातील कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता अद्यापही लसीकरण न होण्यामागे अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याची माहिती पालिका अधिकारी देतात. लसीकरण घेतल्यास संततीप्राप्तीमध्ये बाधा येणे, धर्मांत लसीकरणास मान्यता नसणे आदी कारणे देत लसीकरण नाकारले जाते. कित्येकदा संबंधित विभागात लसीकरणासाठी भेटी दिल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, अशी कबुली आरोग्य सेविकांनी दिली.

५६५ रुग्णांची वयोगटानुसार माहिती

वयोगट                रुग्णांची संख्या
० ० ते ५                     ४०९
० ५ ते ९                     १०९
० १० ते १४                  २५
० १५ वर्षांपुढील           २२

(हेही वाचा – नव्या वर्षातही गोवरचे मृत्यूसत्र सुरूच)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.