तीन दिवसानंतर मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास, फटाक्यांचे प्रमाण कमी झाल्याने हवेचा दर्जा सुधारला

141

तबब्ल तीन दिवसानंतर मुंबईत गुरुवारी, 27 आॅक्टोबर रोजी फटाके फारच कमी प्रमाणात फोडले जात होते. परिणामी गुरुवारी हवेच्या दर्जात प्रचंड सुधारणा दिसून आली. गुरुवारी मुंबईतील हवेचा दर्जा अतिशय खराब या वर्गवारीतून ठीक वर्गवारीत पोहोचला. सोमवारनंतर मुंबईतील एकूण हवेचा दर्जा दोनशे ते तीनशेपर्यंत पोहोचला होता. त्या तुलनेत गुरुवारी हवेचा दर्जा ११८ वर पोहोचला. मात्र मुंबईच्या एकूण परिसराच्या काही स्थानकांमधील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण फारच जास्त होते.

इतके वाढलेले प्रदूषण

केंद्रीय पृथ्वी व विज्ञान संस्थेच्या ‘सफर’ या प्रणालीतून ही माहिती समोर आली. दिवाळीच्या दिवसापासून मुंबईत सातत्याने मालाड आणि नवी मुंबईत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त नोंदवले जात होते. गुरुवारीही नवी मुंबईतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३१६ वर होते. त्याखालोखाल मालाड येथील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३०१ वर पोहोचले. मालाडनंतर माझगाव येथील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३०० वर नोंदवले गेले. तिन्ही ठिकाणी हवेचा दर्जा अतिशय खराब होता, असे निरीक्षण सफरच्यावतीने नोंदवले गेले. तर खराब वर्गवारीत चेंबूर, कुलाबा, अंधेरी आणि बोरिवली गणले गेले. चेंबूरमध्ये २४५, कुलाब्यात २३९, बोरिवलीत २२८, अंधेरीत २२१ एवढा अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा होता. वरळीत ६८ आणि वांद्रे-कुर्ला संकुलात ७० एवढा अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा नोंदवला गेला.

(हेही वाचा पाकिस्तान झिम्बाब्वेसोबतही हरला, T20 World Cup मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.