धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) येथे अमली पदार्थ सापडले आहेत. या प्रकरणाच्या तपासात आता मुंबई कनेक्शन पुढे आले आहे. दरम्यान, तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्रात ड्रग्ज आढळून आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. (Tuljapur Drugs Case)
(हेही वाचा – Mahakumbh 2025 राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्याला जाणार का?; काँग्रेसने केले स्पष्ट)
तुळजापूर शहरात कुठे ड्रग्स विक्री केली जाणार होती. पोलिसांनी आरोपींकडून 45 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहेत. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एम डी ड्रग्स तस्करी प्रकरणातील तीनपैकी दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचेही पुढे आले आहे. संदीप राठोड विरोधात नळदुर्ग (Naldurg) पोलिसांत गुटखा तस्करीसह पाच गुन्हे आहेत. अमित अरगडे विरोधात ही दोन गुन्हे दाखल आहे.
या दोघांनी मुंबईतून (Mumbai) एका महिलेकडून हे ड्रग्स खरेदी केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. तुळजापूर (Tuljapur) शहरात ड्रग्स घेऊन येणाऱ्या तिघांना तामलवाडी टोल नाक्यावर पोलिसांनी अटक केले या प्रकरणाच्या चौकशीत हे ड्रग्स स्वतःसाठीच खरेदी केल्याची आरोपींनी कबुली दिली असून त्या संदर्भात कबुलीनामा ही देण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात ड्रग्ज विक्रीचे रॅकेट असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. (Tuljapur Drugs Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community