महाराष्ट्रातील बहुतांश भागाचे शहरीकरण झाले आहे. त्यामुळे तेथील गावपण जवळजवळ संपुष्टात आले आहे. मात्र कोकण याला अजूनही अपवाद आहे. कोकण भूमी आजही निसर्गसंपन्न आहे. त्यामुळे विसाव्यासाठी लोकांचे कोकणच्या दिशेने पाय वळतात. अशा कोकणात स्वतःचे घर असावे, असा विचार अनेकांना येतो, पण ते कुठे मिळेल हा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर ‘कोकण प्रॉपर्टीज’ (Kokan Properties) नावाने भरलेल्या भव्य प्रदशर्नात मिळते.

कोकण प्रॉपर्टीज (Kokan Properties) या प्रदर्शनात ४० बिल्डरांनी सहभाग घेतला आहे. कोकणवासियांच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. यामध्ये वन रुम किचनपासून २ बीएचकेपर्यंत अगदी बंगलेही याठिकाणी पाहता येतील. हे असे प्रदर्शन २०१५ सालापासून भरवत आहोत. कोकणवासी बऱ्यापैकी मुंबईत स्थायिक झाले आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत आलो आहोत. सेकंड होम म्हणून मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांनी कोकणातील प्रॉपर्टीजचा (Kokan Properties) विचार करावा, कोकणात गुंतवणूक करावी. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोकणच्या बाहेरील लोकही कोकणातील प्रॉपर्टीजकडे आकर्षित होत आहेत. निसर्गसंपन्न कोकणाकडे लोक आकर्षित होत आहेत. कोकणातील बिल्डर छोटे आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे.
– गजानन कांदळगावकर, बांधकाम व्यावसायिक, ‘आकार’चे प्रमुख
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ एका पटांगणात हे प्रदर्शन (Kokan Properties) ४ ते ६ एप्रिल हे तीन दिवस भरवण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ४० बांधकाम व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत. क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित ‘कोकण प्रॉपर्टीज’ (Kokan Properties) या प्रदर्शनात सिंधुदुर्ग आणि रत्नगिरी या दोन जिल्ह्यांतील प्रॉपर्टीची सविस्तर माहिती नागरिकांना मिळत आहे. मुंबईत मध्यभागी दादर येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शुक्रवारी, ४ एप्रिल हा कार्यालयीन दिवस असतानाही या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे त्या त्या प्रमाणातील प्रॉपर्टीची हमखास माहिती या प्रदर्शनातून मिळत आहे. त्यामुळे या प्रदर्शनाकडे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. या प्रदर्शनाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनीही भेट दिली. त्यावेळी या प्रदर्शनातील ‘आकार’ या बांधकाम कंपनीचे प्रमुख गजानन कांदळगावकर यांनी राजेंद्र वराडकर यांचा सत्कार केला.
Join Our WhatsApp Community