मुंबईकरांनो, जाणून घ्या कोरोनाचे नवे हॉटस्पॉट! 

मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढू लागली आहे. सरकारने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनलॉक केल्यानंतर मुंबईत आता बहुतांश व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले आहेत. त्यातच लोकल सेवाही सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यातच नागरिकांमधील गांभीर्य कमी होऊ लागले असल्याने आता रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईत नवे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४५५ दिवसांवर आला आहे.  या अंतर्गत मुंबई महापालिकेने 85 कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. तर ९९२ इमारती सील केल्या आहेत.

मुंबईत याआधी कोरोना काळात धारावी हा हॉटस्पॉट होता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन चिंतेत आले होते. मात्र अथक प्रयत्नानंतर महापालिकेने या ठिकाणाचा कोरोना नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. परंतु आता जरी धारावी कोरोनामुक्त झाली असली तरी मागील आठवड्यापासून मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट निर्माण होत आहेत. राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु केल्यानंतर आठवड्याभरातच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. १४ आणि १५ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट खालीलप्रमाणे आहेत.

(हेही वाचा : नियमांचे पालन करा अन्यथा… काय म्हणाले मुख्यमंत्री?)

मुंबईतील हे आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट!

  • मुंबईतील बोरीवली भागात सर्वाधिक रुग्ण संख्या असून ती ४०८ पर्यंत पोहचली आहे.
  • अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या ३७८ वर पोहचली आहे. त्यात या परिसरातील १०० इमारती सील करण्यात आल्या.
  • कांदिवली, चारकोपमध्ये ३४५ कोरोना रुग्ण आहेत. या ठिकाणी आतापर्यंत ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मालाड, मनोरी, मारवे, अक्सा, मढ इथे ३३८ कोरोना रुग्ण आहेत.
  • मुलुंडमध्ये २९२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून इथे २०२ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
  • घाटकोपर, विद्याविहार आणि पंतनगर या भागातील १६२ इमारती सील करण्यात आल्या. १४ झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये कन्टेनमेंट झोन तयार करण्यात आले. इथे २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर येथील १० झोपडपट्ट्या आणि चाळी कन्टेनमेंट झोनमध्ये आहेत. या वॉर्डमध्ये २८१  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here