खुशखबर! लोकलचे तिकीट, पास UTS वरून काढता येतेय

कोरोना काळातील लॉकडाउनमुळे रेल्वेचे UTS अ‍ॅप बंद होते, त्यामुळे अनेकांची गैरसोय होत होती, मात्र आता मुंबईकरांना यापासून दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागताच रेल्वेने लसीच्या २ डोस घेतलेल्यांना मासिक पाससह दैनंदिन तिकीट देण्यास सुरुवात करताच युटीएस अ‍ॅपही सुरु केले आहे. कोरोना पूर्व काळात मुंबई आणि परिसरातून तब्बल ८० लाखांहुन अधिक प्रवासी लोकलमधून प्रवास करतात, यापैकी १० टक्के प्रवासी हे UTS अ‍ॅपचा वापर करत होते.

लसवंतानाच लाभ 

विशेष म्हणजे रेल्वेने हे अ‍ॅप हे युनिवर्सल पासशी लिंक केले आहे. लशीचे दोन डोस होत १४ दिवस पुर्ण झालेल्या लसवंत नागरिकांनाच युनिवर्सल पास सरकारकडून दिला जातो. अशा प्रवाशांना आता तिकीट आणि पाससाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, ते मोबाईलवरून तिकीट आणि पास काढू शकतात, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले आहे. ऑगस्ट महिन्यापासून लसीकरण झालेल्या लोकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली होती. असे असले तरी गर्दी टाळण्यासाठी तिकीट सुविधा सुरु करण्यात आली नव्हती. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी याबद्द्ल संताप व्यक्त केला होता. त्यानंतर युनिवर्सल पास असलेल्यांना तिकीट सुविधा सुरु करण्याचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आला. तरीही तिकीट खिडकीवर गर्दी वाढत होती, ही गर्दी कमी करण्यासाठी आता UTS अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट आणि पास उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here