Mega block : मध्य रेल्वे (Central Railway), मुंबई विभाग रविवार दिनांक ०६ एप्रिल रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक (MegaBlock) घेण्यात येणार आहे. तपशील पुढीलप्रमाणे… (Mega block)
माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
(हेही वाचा – Veer Savarkar यांचा अवमान केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला राहुल गांधींना झटका; समन्स रद्द करण्यास नकार)
ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
(हेही वाचा – मराठी भाषेबाबत MNS आक्रमक; कल्याणमध्ये बँकांना दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम)
हार्बर रेल्वे
ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर (Trans-Harbour Railway Mega Block) मार्गावरील सेवा सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. या मेगाब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तसेच ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी डाऊन मार्गावरील सेवा आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
(हेही वाचा – Sanjay Raut यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये ‘बेड’ बुक करु; Anand Paranjape यांची सडकून टीका)
हे मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे (Local Railway) प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community