मुंबईकरांनी (Mumbai) गेल्यावर्षी महागड्या कारला (Expensive Car) पसंती दिली. जानेवारी ते डिसेंबर 2024 या दरम्यान 1353 महागड्या आणि आलिशान कारची खरेदी करण्यात आली. या वाहनांची किंमत एक कोटीहून अधिक आहे. मुंबईत ताडदेव आरटीओ मध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. बीएमडब्ल्यूने (BMW) महागड्या गाड्यांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. कोरोना काळात दोन वर्षे नागरिकांची आर्थिक आवक थांबली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात नागरिकांची आर्थिक गाडी हळूहळू रुळावर आल्यानंतर गेल्या काही दिवसात महागड्या गाड्या आयात करण्याचे प्रमाण वाढले आहे.(Expensive Car)
हेही वाचा-Chhattisgarh मध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार, DRG चा एक जवान हुतात्मा
फेरारी, लेम्बोर्गिनीपासून ते ऑडीची खरेदी करण्यात आली. मिनी कूपर, जागवार, मर्सिडीज, फोर्स, रोल्स, रॉयल्स यासारख्या चार चाकी तर अमेरिका ड्रीम्स, डुकाटी, मॉन्स्टर, स्क्रॅंबलर या दुचाकींच्या प्रेमात श्रीमंत मुंबईकर पडले आहेत वर्षभरात कोट्यावधी किमतीच्या महागड्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. (Expensive Car)
हेही वाचा-Maharashtra Weather : थंडी परतली! राज्यात पुढील तीन दिवस ‘असे’ असेल हवामान
इलेक्ट्रिक, सीएनजी, पेट्रोल, डिझेल, यासारख्या इंधनावर धावणारी ही वाहन आहेत. प्रतिष्ठा आणि आरामदायी प्रवासासाठी या वाहनांची खरेदी वाढली आहे. 2024 मधील 19 डिसेंबर रोजीपर्यंत ताडदेव आरटीओमध्ये 665, अंधेरी आरटीओमध्ये 495, वडाळा आरटीओमध्ये 130, बोरिवली आरटीओमध्ये 120 अशा एकूण 1410 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. (Expensive Car)
हेही वाचा-Bandipora Army Accident : बांदीपोरामध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; तीन जवान हुतात्मा, दोन जखमी
या वाहनांचा दुरुस्तीचा खर्च अधिक आहे. या वाहनांवर 20 टक्के नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. गेल्या वर्षी 1410 वाहनांची नोंदणी झाली. या वाहनांची किंमत एक कोटीहून अधिक आहे. मुंबईत ताडदेव आरटीओ मध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याद्वारे परिवहन विभागाला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. (Expensive Car)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community