मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार; प्रवाशांच्या सेवेत आणखी 10 Mono Rail दखल होणार

78

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (Chembur to Sant Gadge Maharaj Chowk) या मोनो रेल (Mono Rail) मार्गावर ऑगस्ट २०२५ पासून आणखी दहा नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्याचे नियोजन महा मुंबई (Mumbai) मेट्रो संचलन मंडळाने (MMMOCL) केले आहे. यातून मोनो मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मोनोच्या ताफ्यात आतापर्यंत तीन नव्या गाड्या दाखल झाल्या आहेत. उर्वरित गाड्या जून २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने मोनोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यातून या मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊन इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी मोनो (Mono New Train) गाडीची वाट पाहत ताटकळत थांबण्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे.

सद्यःस्थितीत मोनो मार्गिकेवर ८ गाड्या उपलब्ध आहेत. त्यामधील ६ गाड्यांतून प्रत्यक्षात वाहतूक सेवा दिली जाते. तर दोन गाड्या देखभाल-दुरुस्तीसाठी ठेवल्या जातात. दरदिवशी सहा गाड्यांमार्फत ११८ फेऱ्या होत आहेत. त्यातून सध्या कार्यालयीन दिवसांत या मार्गिकेवर दर १५ मिनिटांच्या वारंवारितेने, तर ‘वीक एंड’ला १८ मिनिटांच्या वारंवारितेने मोनो गाड्या धावत आहेत.

(हेही वाचा – Juvenile Offenders : अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे होणार ?; अजित पवार यांची माहिती)

मात्र, एवढा वेळ गाडीची वाट पाहणे शक्य नसल्याने प्रवाशांकडून मोनोतून प्रवासाकडे पाठ फिरवली जाते. त्यातून सध्या मोनोतून सरासरी १६,५०० प्रवासी प्रवास करत आहेत. त्यातून या मार्गावरील गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने नव्या गाड्या खरेदी केल्या जात आहेत. 

दोन फेऱ्यांमधील वेळ कमी होणार 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मोनो मार्गिकेवर अतिरिक्त १० गाड्या खरेदी करण्यासाठी मेधा सव्हों ड्राइव्हज (Medha Servo Drive) या कंपनीला ऑक्टोबर २०२१ मध्ये कंत्राट दिले आहे. या गाड्या सेवेत दाखल झाल्यानंतर मोनो मार्गिकेवरील गाड्यांची वारंवारिता ७ मिनिटांवर येईल, तसेच १२ मोनो गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देण्याचे नियोजन ‘एमएमएमओसीएल’ने केले आहे. फेब्रुवारीमध्ये २ गाड्या, मार्चमध्ये एक गाडी तर उर्वरित ४ गाड्या जूनमध्ये दाखल होणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.