हवेच्या वाढत्या प्रदूषणाने (pollution) मुंबईकरांची कोंडी झाल्यानंतरही त्याची माहिती देणारे १४ पैकी ११ बोर्ड आठ महिन्यांपासून बंद असल्याची बातमी एक वर्तमान पत्राने दिल्यानंतर हवामान शास्त्र संस्थेला जाग आली आहे. वर्तमान पत्राच्या दणक्यानंतर प्रदूषण दर्शविणारे १४ पैकी १४ डिजिटल बोर्ड नव्याने लागणार आहेत. संबंधित बोर्ड आठ महिन्यांपासून बंद आहेत. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM, Pune) हे बोर्ड बदलण्यात येणार असल्याचे वर्तमान पत्राला सांगितले. (Digital Board)
मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची तीव्रता नागरिकांना कळावी यासाठी केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत आयआयटीएम संस्था, महापालिकेच्या प्रयत्नामुळे सफर प्रकल्पाअंतर्गत १४ डिजिटल बोर्ड (14 Digital Board) बसविण्यात आले होते. बोर्ड बंद असल्याने मुंबईकरांना हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळत नव्हती.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी हे बोर्ड बसविण्यात आले आहेत. यामध्ये वांद्रे, चेंबूर, दादर, दहिसर, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, हाजीअली, जुहू, कांदिवली आणि नवी मुंबईमधील डिजिटल बोर्ड (Digital Board) बंद आहेत. तर फोर्ट, मंत्रालय आणि विमानतळ परिसरातील बोर्ड सुरू आहेत.
(हेही वाचा – Karnataka Accident : कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या कारचा अपघात)
आकडेही दिसेनात
डिजिटल बोर्ड खूप जुने झाले होते. त्यावरचे प्रदूषणाचे आकडे नीट दिसत नव्हते. बोर्ड समोरून पाहिला तरच आकडे दिसत होते. बाजूने पाहिले तर त्यावरचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे जुने बोर्ड बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या अॅण्ड्रॉइडला जुनी सिस्टम किंवा अॅप सपोर्ट करत नव्हते. त्यामुळे अपडेट करण्याचे काम सुरू आहे. टेंडर निघाले असून, आयटी कंपनीकडून याचे काम सुरू आहे. एक ते दोन महिन्यांत हे काम होईल.
(हेही वाचा – दिल्लीतील आप सरकारची ‘कॅग’ अहवाल विधानसभेत मांडण्यास टाळाटाळ; Delhi High Court चे ताशेरे)
एकूण खर्च समजणार
नवे बोर्ड बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच टेंडर काढले जाईल. बोर्ड बसविण्या- साठीची आर्थिक तरतूद केली जाईल. सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे टेंडर काढल्यानंतर बोर्ड बस- विण्यासाठी किती खर्च येईल? याची अधिकृत माहिती मिळेल.
(हेही वाचा –इस्त्रोच्या अध्यक्ष म्हणून Dr. V Narayanan यांनी स्वीकारला पदभार)
भारतीय कंपन्यांकडून बोर्ड घेणार
आता असलेल्या डिजिटल बोर्डपेक्षा चांगल्या दर्जाचे आणि स्वस्त डिजिटल बोर्ड बाजारपेठेत आहेत. भारतीय कंपन्या अशा प्रकाराचे डिजिटल बोर्ड पुरवितात.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community