रविवारच्या सायंकाळी मुंबईकरांना पावसाच्या हलक्या सरींचा अनुभव देणारी ठरली. चार दिवसांपूर्वी संततधार कोसळलेल्या पावसामुळे सध्या उकाडा फारसा जाणवत नाही. सोमवारी दिवसभर आकाश ढगाळ राहील तर सायंकाळी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मंगळवारी मात्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
पावसाच्या हलक्या सरी
शुक्रवारपासून दक्षिण मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्य मुंबईत घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, दादर, परळ या भागांत सायंकाळी हलका पाऊस सुरु होता. पश्चिम उपनगरात कांदिवली, मालाड, मरोळ, अंधेरी तर मध्य मुंबईत विक्रोळी, भांडुप, मुलुंडमध्ये पावसाचे शिडकावे सुरु होते. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हाजीअली परिसरातही पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत केवळ चेंबूर परिसरात 29.6 मिमी पाऊस झाला असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community