Mahim Seafood Plaza : माहिम कोळीवाड्यात मुंबईतील पहिले सी फुड प्लाझा खवय्यांसाठी झाले खुले

मुंबईतील हे पहिले सी फुड प्लाझा असून ३६५ दिवस याठिकाणी कोळी पध्दतीच्या मांसाहारी पदार्थांचा आस्वाद लोकांना घेता येणार आहे.

827
Mahim Seafood Plaza : माहिम कोळीवाड्यात मुंबईतील पहिले सी फुड प्लाझा खवय्यांसाठी झाले खुले
Mahim Seafood Plaza : माहिम कोळीवाड्यात मुंबईतील पहिले सी फुड प्लाझा खवय्यांसाठी झाले खुले

मुंबईतील कोळीवाड्यांमधील सी फुडची अस्सल लज्जतदार पदार्थांची चव पर्यटकांनाही चाखता यावी यासाठी शहराचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतील पहिले सी फुड प्लाझा माहिम कोळीवाड्यात सुरु झाले आहे. मुंबईतील हे पहिले सी फुड प्लाझा असून ३६५ दिवस याठिकाणी कोळी पध्दतीच्या मांसाहारी पदार्थांचा आस्वाद लोकांना घेता येणार आहे. (Mahim Seafood Plaza)

New Project 14

कोळी बांधवांचा व महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीकोनातून महिला बचत गटामार्फत चालविण्यात येणाऱ्या माहिम कोळीवाड्यातील समुद्र किनारी सी फुड प्लाझा सुरु करण्याचा संकल्पना पालकमंत्र्यांनी मांडली होती. त्यानुसार माहिम कोळीवाड्यातील समुद्र किनारी तंबुची सुंदर व्यवस्था असलेल्या सी फुड प्लाझाची उभारणी करण्यात आली. या सी फुड प्लाझाचे लोकार्पण गुरुवारी शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते पार पडले. आठवड्याच्या दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तिन्ही दिवशी चालणार. महापालिकेच्या नियोजन विभागाच्या मदतीने कोळीवाड्यातील महिलांना एकत्र आणून त्यांचे बचतगट तयार करण्यात आले, आणि त्यांना मत्स्यविभागाच्या वतीने सी फूड बनवण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, उपायुक्त रमाकांत बिरादर, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते. (Mahim Seafood Plaza)

New Project 15

मुंबईतील हे पहिले सी फुड प्लाझा असून प्रत्येक दिवशी दोन महिल बचत गटांना याठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करता येऊ शकते, याठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीचे दोन स्टॉल्स असून याठिकाणी ४० लोकांची बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ३६५ दिवस हे सी फुड प्लाझाचे स्टॉल्स असतील शिवाय कोळी नृत्यही याठिकाणी सादर करून कोळी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे कोळी नृत्याच्या आनंद घेत स्पेशल कोळीवाडा खाद्यपदार्थांचाही आस्वाद लुटता येणार आहे. (Mahim Seafood Plaza)

New Project 16

(हेही वाचा – Yogi Adityanath : तालिबानविषयी बोलतांना योगी आदित्यनाथ यांनी का केला बजरंग बलीच्या गदेचा उल्लेख ?)

तत्पूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जी उत्तर विभागातील माहिम मतदार संघातील विविध स्थळांची कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी श्री सिध्दीविनायक मंदिरात सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले आणि मंदिर परिसराची पाहणी केली.तसेच कामाचाही आढावा घेतला. त्यानंतर भागोजी कीर स्मशानभूमी, दादर चौपाटी, नाना-नानी उद्यान, वीर नरिमन नगर, प्रभादेवी चौपाटी, माई मंगेशकर मुलांचे उद्यान, दादर जलतरण तलाव, माहिम पोलिस स्टेशन, हिंदुजा हॉस्पीटल येथील नागरिकांच्या समस्याबाबत चर्चा केली. त्यानंतर माहिम कोळीवाडा येथील जिल्हा विकास नियोजन निधीमधून पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या विविध कामांचे भुमिपुजन तसेच लोकार्पण केले. मुंबईमधील कोळीवाडा हे प्रमुख पर्यटनाचे केंद्र बनावे याकरिता शासन कटिबध्द असल्याचे पालकमंत्री यांनी नमुद केले व या करिता येणाऱ्या भविष्य काळात विविध कामे, योजना हाती घेण्यात येतील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. (Mahim Seafood Plaza)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.