मुंबईतील स्टेप्स सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार सुमारे ४६ टक्के नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे. यातील १२ टक्के मुंबईकर लठ्ठ असल्याचे आढळले गेले. या लठ्ठपणात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लठ्ठपणात पुरुषाचा तुलनेत महिलाच पुढे असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. (World Diabetes Day)
जागतिक आरोग्य संघटना व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईत सन २०२१ मध्ये स्टेप्स सर्वेक्षण केले होते. त्यात ही माहिती समोर आली आहे. तर या सर्वेक्षणानुसार १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. प्री-डायबेटिसची टक्केवारी १५.६ टक्के आहे. (रक्तातील साखरेचे प्रमाण ≥ ११० mg/dl आणि < १२६ mg/dl) आणि जर अशा व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाही, तर अशा व्यक्तींना पुढे जाऊन मधुमेह होऊ शकतो. तर ८.३ टक्के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजार आढळले. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो व सामान्यतः ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक व्यक्तींना प्रभावित करतो. (World Diabetes Day)
महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये मधुमेह संदर्भातील प्राथमिक चाचणी आणि निदान करण्याच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका दवाखाना व आपला दवाखाना येथे प्रत्येक महिन्यात ६० ते ७० हजार नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येते आणि सुमारे ५० हजार रुग्ण नियमितपणे मधुमेहासंदर्भातील उपचार घेत आहेत. ३० वर्षे पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची अधिकाधिक सक्षमरीत्या चाचणी करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आपल्या २६ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट २०२२ पासून मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी केंद्र (NCD Corners) सुरु केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत २ लाख ५४ हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी १२ टक्के व्यक्तिमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण (random sugar) १४० मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक आहे. या सर्व व्यक्तींना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. (World Diabetes Day)
मधुमेह असलेल्या रुग्णांना आहार विषयक सल्ला देण्याची/समुपदेशन सेवा महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ३२ हजार रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैली बदल व मधुमेह संदर्भातील समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विभागात मनपाद्वारे चालू करण्यात आलेले योग केंद्राचा लाभ नागरिकांनी घ्यावे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक आरोग्य चाचणी करून उपचार घेण्यासाठी मुंबईकरांना महानगरपालिकेचे दवाखाने/हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (World Diabetes Day)
(हेही वाचा – काँग्रेस सोन्याचा महाल बनवण्याचे आश्वासन देईल; पण सोने बटाट्यापासून बनवणार का?; PM Narendra Modi यांची टीका,)
कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह म्हणाल्या की, मधुमेह असलेल्या व्यक्तींपैकी किमान ५० टक्के नागरिकांना आपल्याला मधुमेह झाला आहे, हे निदान होईपर्यंत प्रत्यक्षात ठाऊकच नसते. त्यामुळे आरोग्य विषयक गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहून नियमितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. येत्या १४ नोव्हेंबर २०२३ जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने मुंबईतील उद्यानामध्ये मोबाईल व्हॅन, रेल्वे स्थानक, सामान्य सुविधा केंद्र (CFC wards ), मॉल्समध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. (World Diabetes Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community