थंडीने राज्यात काकड आरती सुरु असताना, आता मुंबईतील तापमान पूर्ववत होत असल्याचा अनुभव येत आहे. राज्यात गारठवणाऱ्या थंडीला ब्रेक लागला असून, थंडीचा प्रभाव उत्तर कोकण वगळता सर्वत्र दिसून येत आहे. शनिवारी विदर्भात थंडीचा दिवस राहील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.
तरी थंडीचा प्रभाव कायम
शुक्रवारच्या कमाल तापमानाच्या नोंदीनंतर मुंबईत कमाल तापमान 32 अंशावर पोहोचताच, कडक्याच्या थंडीला ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले. सरासरीहून मुंबईचे कमाल तापमान दोन अंशाने जास्त होते. याउलट मालेगावात राज्यातील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली. मालेगावात 21.4 अंश सेल्सीयस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यातून थंडीची लाट ओसरली असली, तरीही थंडीचा प्रभाव कायम आहे. येत्या दिवसांत कमाल तापमान बहुतांश भागात पूर्ववत होईल अशी माहिती वेधशाळा अधिकाऱ्यांनी दिली.
( हेही वाचा: गणवेषाऐवजी मला बुरखा घालू द्या! मुस्लिम विद्यार्थीनीच्या मागणीला चपराक )
विदर्भात हुडहुडी कायम
उत्तर भारतात झालेल्या बर्फवृष्टीचा प्रभाव विदर्भात जाणवत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या पाच दिवसांत नागपूरच्या तापमानात तब्बल 7 अंशांची घसरण झाली. गुरुवारीही तापमानात दीड अंशांची घट होऊन, पारा या मोसमात चौथ्यांदा दहाच्या खाली म्हणजेच 8.3 अंशांवर आला.
Join Our WhatsApp Community