मुंबईची एकूण रुग्णसंख्या घटली: ८ हजार रुग्ण बाहेरचे!

एकूण ८ हजार रुग्ण हे मुंबई बाहेरील असल्याचा डेटा प्राप्त झाला. त्यातील साडेचार हजार रुग्णांची कमी करण्यात आली, तरी उर्वरीत रुग्णांची माहिती संबंधित जिल्ह्याला करून दिल्यानंतर आणखी संख्या कमी होणार आहे. 

79

मुंबईमध्ये आजवर झालेल्या एकूण कोविड रुग्णांपैकी तब्बल चार हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. महापालिकेने कोविड रुग्णांची पुन्हा छाननी केल्यानंतर यातील चार हजार रुग्ण हे मुंबई बाहेरील आहेत. त्यामुळे मुंबई बाहेरील या रुग्णांची नोंद त्या त्या जिल्ह्यांमध्ये करून मुंबईतील एकूण संख्येतून या रुग्णांचा आकडा कमी करण्यात आला आहे. मात्र, सध्या चार हजार रुग्ण हे मुंबई बाहेरचे असले तरी अजून चार हजार रुग्णांची संख्या कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. तब्बल आठ हजार रुग्ण हे मुंबई बाहेरील विविध भागांमध्ये असून त्यांची माहिती मुंबईतील रुग्णांमध्ये जोडल्याने एकूण रुग्णांचा आकडा फुगला होता.

एका दिवसात ४,४६७ एवढी रुग्ण संख्या कमी  

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ६९३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवरच्या एकूण कोविड रुग्णांची संख्या ७ लाख २० हजार ३३९ एवढी झाली. परंतु गुरुवारी आढळून आलेल्या ७८९ नवीन रुग्णांमुळे आजवरची एकूण रुग्ण संख्या ही ७ लाख २४ हजार ११३ एवढी होती. त्यामुळे एका दिवसात ४,४६७ एवढी रुग्ण संख्या कमी दर्शवली गेली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाबरोबर झालेल्या रिकंसीलेशन नुसार हे ४,४६७ रुग्ण संख्या ही एकूण बाधित रुग्ण यांच्या प्रगतीपर अहवालातून कमी करण्यात आली आहे.

(हेही वाचा : ईडीने न्यायालयात सांगितला वाझे-देशमुखांचा १०० कोटी वसुलीचा मार्ग ! )

मुंबई बाहेरील इतर भागांमधील रुग्णसंख्या वाढली  

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईमध्ये पालघर, ठाणे, नवी मुंबई आदी जिल्ह्यातील अनेक भागांमधून अनेक कोविड बाधित रुग्ण उपचाराकरता येतात. त्या इतर जिल्ह्यातील भागांमधून मुंबईत उपचार घेतलेल्या रुग्णांची नोंदही मुंबईत एकूण रुग्णसंख्येत समाविष्ट करण्यात आली आहे. या रुग्णांच्या नेांदी आयसीएमच्या संकेतस्थळावर नोंदवल्या गेल्याने तसेच मुंबईत उपचार घेत असल्याने मुंबईच्या रुग्णांमध्ये दाखवल्या गेल्या. परंतु आता या सर्व रुग्णांच्या निवासी पत्त्याच्या आधारे त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली असता आणि जिल्ह्यांकडून आपल्या रुग्णांची नोंद स्वत:कडून करून घेतल्यानंतर आता मुंबईच्या एकूण रुग्णसंख्येतून ४,४६७ रुग्णांची संख्या कमी करण्यात आली आहे. या रुग्णांच्या नोंदी त्या त्या जिल्ह्यात तसेच तेथील महापालिकांमधील एकूण रुग्णसंख्येत करण्यात आल्या आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मुंबई बाहेरील इतर भागांमधील रुग्णसंख्या यामुळे वाढलेली आहे. अशाप्रकारे एकूण ८ हजार रुग्ण हे मुंबई बाहेरील असल्याचे डेटा प्राप्त झाला आहे. त्यातील सुमारे साडेचार हजार रुग्णांची कमी करण्यात आली असली तरी उर्वरीत रुग्णांची माहिती संबंधित जिल्ह्याला करून दिल्यानंतर ती सुध्दा रुग्ण संख्या मुंबईच्या एकूण रुग्णसंख्येतून कमी होणार असल्याची माहिती मिळत आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.