Munawar Faruqui: मनसेच्या इशाऱ्यानंतर मुनव्वर फारुकीचा माफीनामा

153
Munawar Faruqui: मनसेच्या इशाऱ्यानंतर मुनव्वर फारुकीचा माफीनामा
Munawar Faruqui: मनसेच्या इशाऱ्यानंतर मुनव्वर फारुकीचा माफीनामा

मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरला होता. त्याचा कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मनसे, शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून इशारा देण्यात आला होता. मुनव्वर फारुकीवर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार झाला होता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मुनव्वर फारुकीने X वर माफी मागितली आहे.

मुनव्वर फारुकी नेमकं काय म्हणाला?
आपल्याला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. आपल्याकडून ते शब्द अनावधानाने निघाले होते. तसेच आपले कोकणावर अफाट प्रेम आहे, असंही मुनव्वर म्हणाला आहे. मुनव्वर फारुकी स्टँडअप कॉमेडी करत असताना तो प्रेक्षकांना “मुंबईतून सर्वजण आले आहेत ना?”, असं विचारतो. “कुणी लांबून प्रवास करुन आलं नाही ना?”, असं विचारतो. यावेळी प्रेक्षकांमधील एकजण आपण तळोजा येथून आल्याचं सांगतो. त्यावर मुन्नवर बोलतो, “अच्छा आज विचारलं प्रवास करुन आलात का? तर तळोजा म्हणून सांगत आहात. तळोजा मुंबईपासून वेगळा झाला. पण यांचे गाववाले जेव्हा यांना विचारतात की, कुठे राहतात? तर मुंबईत राहतात असं सांगतात. हे कोकणी लोकं सर्वांना चु** बनवतात”, असं वादग्रस्त वक्तव्य मुनव्वर फारुकी याने केलं. मुन्नवरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. (Munawar Faruqui)

मुनव्वर फारुकीचा माफीनामा

यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्याने आपल्या ट्विटरवर माफी मागताना म्हटले की, “संबंधित शब्द हे प्रेक्षकांसोबत संवाद साधत असताना अनावधानाने माझ्या मुखातून निघाले होते. पण मी आता पाहिलं की, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. माझा एक स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून सर्वांना हसवण्याचा हेतू असतो. माझ्यामुळे कुणी दु:खी होऊ नये, असं मला वाटतं. कोणत्याही कारणामुळे कुणी माझ्यामुळे दु:खी होऊ नये, असं मला वाटतं. त्यामुळे मी मनापासून आपल्या सर्वांची जाहीर माफी मागतो. मी तेव्हा वक्तव्य केलं तेव्हा त्या लोकांनी ते शब्द एन्जॉय केले होते. कार्यक्रमाला सर्व लोक होते. मराठी, हिंदी, तेलगू, तामिळ असे विविध भाषिक प्रेक्षक तिथे उपस्थित होते. पण आता इंटरनेटवर अशाप्रकारच्या गोष्टी आल्यावर माहिती पडतं. मी मनापासून सर्वांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.” अशा शब्दांत मुनव्वर फारुकीने माफी मागितली आहे. (Munawar Faruqui)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.