देशासह राज्यात माहितीच्या अधिकाराचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, मुंबई महापालिकेत विविध माहितीच्या अनुषंगाने येत असलेल्या माहितीच्या अर्जांवर कोणत्याही प्रकारची ठोस माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही. उलट माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जातील माहिती समजून न घेता त्यांची उत्तरे दिली जात नाहीत, तसेच आपल्याकडील जबाबदारी टाळण्यासाठी संबंधित विभागांकडे वर्ग करण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्याने अखेर याबाबत २ जून २०२३ रोजी सुधारीत परिपत्रक जारी करून अर्ज प्राप्त झाल्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये त्या अर्जावर कार्यवाही करून त्यातील माहिती न समजल्यास अर्जदाराशी संपर्क साधून माहितीचा तपशील जाणून घेत त्यानुसार माहिती देण्यात यावी, अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत. तसेच माहिती नाकारण्यात आली असेल तर कोणत्या कारणास्तव नाकारण्यात आली आहे त्याचे कलम नमूद करण्यात यावे, असेही म्हटले आहे.
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अर्जावर करावयाच्या कार्यवाहीबाबत महापालिकेच्या सामान्य प्रशासनाच्यावतीने ६ जून २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये, जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज काळजीपूर्वक वाचून व त्याचा मतितार्थ जाणून घेऊन अर्जदाराला माहिती देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना केली आहे. ज्या ठिकाणी एखाद्या मुद्याचे स्पष्टीकरण आवश्यक वाटते, अशा वेळेस अर्जदारास दूरध्वनी किंवा पत्राने संपर्क साधून मुद्दा स्पष्ट करून घ्यावा. ही कार्यवाही शक्यतो अर्ज प्राप्त झाल्यापासून ५ दिवसांत करावी. अर्ज किंवा त्याचा काही भाग हा दुसऱ्या जन प्राधिकरणाशी संबंधित असल्यास तो अर्ज किंवा त्याचा भाग अधिनियमानुसार ५ दिवसांच्या आत संबंधित जन माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात यावा. तसेच अर्जदारास कळवण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य माहिती आयोगाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याकरता सर्व जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी यांना वेळोवेळी सूचना तथा निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतु या सूचनांचे पालन काटेकोरपणे होत नसल्याच्या तक्रारी आल्याने महापालिका प्रशासनाने हे निर्देश देत पुन्हा एकदा सूचना करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – नाल्यांच्या बांधकामांपासून ते नालेसफाईपर्यंतच्या कामांवर १८ महिला अभियंत्यांचे लक्ष)
माहितीचा अर्ज महानगरपालिकेच्या इतर खाते तथा विभाग यांच्याशी संबंधित असे अन्वये कार्यवाही करावी. कलम ६ (३) अन्वये अर्ज हस्तांतरित करु नये. माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त झालेला अर्ज इतर सार्वल तर त्याबाबतीत माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ५ (१) अंतर्गत पदनिर्देशित केलेल्या जन माहिती अधिकारी यांनी कलम ५ (४) व ५ (५) जनिक प्राधिकरणांशी संबंधित असेल तरच माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ६ (३) प्रमाणे कार्यवाही करावी. तसेच माहिती अर्जाची माहिती देताना करण्यात येणाऱ्या पत्रव्यवहारावर नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल इत्यादी न चुकता नमूद करावा. याशिवाय माहिती नाकारण्यात आली असेल तर कोणत्या कारणास्तव नाकारण्यात आली आहे त्याचे कलम नमूद करण्यात यावे.
माहिती अधिकार अधिनियम, २००५ कलम ४ (१) (क) (ख) अंतर्गत माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात यावी. जेणेकरुन माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या कमी होईल. अर्जदारास माहिती देताना मुद्देनिहाय माहिती देण्यात यावी. ज्यादिवशी अपील सुनावणी आयोजित केली असेल त्यादिवशी जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी नियोजित वेळी कार्यालयात हजर रहावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community