मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) जेंडर बजेट अंतर्गत मुंबईत राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संगणक,स्कॅनर आणि प्रिंटर अशा स्वरूपाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींना कमी जागेत ऑनलाईन स्वरूपाचे काम करता यावे म्हणून अशा स्वरूपाचे साहित्य दिले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने सुमारे ७८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार असून या साहित्या करता दिव्यांग व्यक्तींकडून १५ डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंरोजगार’ या घटकांतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जेंडर बजेट अंतर्गत मुंबई क्षेत्रात राहणाऱ्या मुंबईतील कायम रहिवासी असणा-या एकूण ५९९ दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता लॅपटॉप, प्रिंटर स्कॅनरसह खरेदी करण्यासाठी जेंडर बजेट अंतर्गत उपलब्ध निधीच्या तरतूदीतून एकूण रु. ४,६९,०१,७०० रुपये एवढे अर्थसहाय्य देण्यास मंजुरी मिळाली होती.
परंतु सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात अशा स्वरुपाची योजना तयार करुन त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात नव्हता. त्यामुळे हा निधी वाया गेला. पण या साठी मागवलेल्या अर्जापैकी पात्र २०१ लाभार्थ्यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उपलब्ध तरतूदीमधून (Municipal Corporation) लाभ देण्यात येईल व उर्वरित १०९९ दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता नव्याने जाहिरात प्रदर्शित करून ऑनलाईन स्वरुपात दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ही योजना आता १३०० लाभाथ्यांकरिता राबविण्याचे प्रस्ताविण्यात येत आहे. मुंबईतील रहीवासी असणा-या दिव्यांग व्यक्तींना लॅपटॉप, प्रिंटर स्कॅनरसह खरेदीकरिता ७८,३०० रुपये एवढे अर्थसहाय्य केले जाणार आहे. त्यामुळे यासाठी १० कोटी १७ लाख रूपये एकूण निधी मंजूर करण्यात आला असून यासाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात…
दिव्यांग व्यक्तींना लॅपटॉप, प्रिंटर स्कॅनर सह खरेदीसाठी अर्थसहाय्य योजनासुध्दा वैयक्तिक लाभाची योजना असल्याने या योजनेची अंमलबजावणी शासनाच्या वरील शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार थेट लाभ हस्तांतरण या पद्धती अंतर्गत योजनेसाठी पात्र लाभार्थ्याने प्रथम वस्तू खरेदी करून त्या वस्तूचे बिल कार्यालयाकडे सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाते.
दिव्यांग व्यक्तींना अशी करता येतील ऑनलाईन कामे…
सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना कमी जागेमध्ये किंवा घरातून ऑनलाईन स्वरुपाची कामे करून उदरनिर्वाह करिता अर्थाजन करून शकेल उदा. महाईसेवा, परिवहन सेवा, रेल्वे बुकींग, ऑनलाई नेटवर्कींग विविध प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण इत्यादी. सदर योजनेचा मुख्य उदेश दिव्यांगांना कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये रोजगार उपलब्ध करुन देणे हा आहे.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून सन २०२१-२२ मधील पात्र झालेल्या १२७ दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी इलेक्ट्रीक सायकल खरेदीकरीता अर्थसहाय्य देण्यात आले.
दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी थेट लाभ यापूर्वी दिलेला लाभ
सन २०१७-१८ : ३०४ लाभार्थी
सन २०१८-१९ : ३३२ लाभार्थी
२०१९-२० : २५२ लाभार्थी
दिव्यांग व्यक्ती या निकषात बसत असतील तर..
जर ते १८ ते ६० वर्षे वयोमर्यादेतील असतील…
जर त्यांचे उत्पन्न दाखल्यानुसार वार्षिक उत्पन्न रु. ३.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल…
जर त्यांना शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रम / खाजगी आस्थापनेवर कायम नोकरी नसेल…
जर ते मानसिक विकलांग दिव्यांग अर्जदारांची पात्रता डिपार्टमेंट ऑफ फिझीटरी सेंट जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम रुग्णालय यांच्यामार्फत नियुक्त समितीमार्फत पात्रता निकषाप्रमाणे पात्रता असतील…
जर त्यांच्याकडे लॅपटॉप, प्रिंटर स्कॅनरसह स्वयंरोजगार व्यवसायाकरिता जागेची उपलब्धता असल्याचे प्रतिज्ञापत्र असेल..
जर त्यांनी आधी शासकीय योजनांचा व सहाय्यक आयुक्त (नियोजन) खात्यातील योजनांचा अद्यापपर्यंत लाभ घेतला नसेल…
जर ते कमीत कमी शालान्त परिक्षा उर्तीण असतील…
जर त्यांच्यकडे शासन मान्यता प्राप्त संस्थेचे संगणकीय प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र असेल जसे की ( MS-CIT, CC+, Tally इ.)
Join Our WhatsApp Community