महापालिकेच्या शिक्षण विभागाला का नको लेखकांच्या साहित्यांचे ऑडीओ बुक्स?

113

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांकरता सुप्रसिध्द लेखकांचे वाड्:मय, नावाजलेल्या कलाकरांच्या आवाजामध्ये ध्वनीमुद्रित करून ध्वनीमुद्रित पुस्तिका अर्था ऑडीओ बुक्स तयार करण्यास महापालिका प्रशासनाने नकार दर्शवला आहे. ध्वनिमुद्रित पुस्तिका (ऑडियो बुक्स) तयार करणे ही अत्यंत खर्चिक बाब असणार आहे. तसेच वाङ्‍‍मयाचे वाचन हे प्रशिक्षित शिक्षकच प्रभावीपणे करू शकतात अशी शिक्षण विभागाची धारणा असल्याने त्यांनी ही मागणी फेटाळली आहे.

वाङ्‍‍मय समजणे आवश्यक

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता महानगरपालिका शिक्षणाच्यादृष्टीने नवनवीन उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त सुप्रसिद्ध लेखकांचे वाड्:मय ओळख होणे तितकेच गरजेचे आहे. परंतु विद्यार्थीदशेत वेगवेगळ्या भाषांतील वाङ्‍‍मय त्यांना पुस्तकातून वाचून समजणे अवघड जाण्याची शक्यता असते. म्हणूनच वेगवेगळे कथा, कविता, लेख, ऐतिहासिक कादंबऱ्या, इत्यादी वाड्म:य त्यांना ऐकवल्यास ते त्यांना समजून त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांकरिता सुप्रसिध्द लेखकांचे वाङ्मय, नावाजलेल्या कलाकारांच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित करुन, ध्वनिमुद्रित पुस्तिका (ऑडियो बुक्स) तयार करण्यात याव्यात. जेणेकरून, विद्यार्थ्यांना विविध भाषांतील वाड्म:याची ओळख होईल,असे म्हटले.

युटयूबवर प्रसारित

याबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विविध माध्यमांच्या भाषाविषयासह इतर सर्व विषयांच्या पाठयक्रम संबंधित विषय वस्तू युट्युब वर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या साहित्यिक रचनांचाही उल्लेख असतो. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पूरक साहित्य म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावर आधारित वेगवेगळ्या कथा, कविता, लेख, ऐतिहासिक कादंबऱ्या इत्यादी वाड्:मयाचे शिक्षकांद्वारे संबंधित युटयूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही केली जाते.

( हेही वाचा: वरळी कोळीवाड्यासाठी वरळी किल्ल्याची डागडुजी )

ही अत्यंत खर्चिक बाब

विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त सुप्रसिद्ध लेखकांचे वाड्:मय वाचून समजणे सुरुवातीला अवघड जाण्याची शक्यता असते. परंतु काही कालावधीनंतर शब्दकोश, विविध वाड्:मयाचे स्वरूप आणि साहित्यकारांची शैली ओळखल्यानंतर साहित्य वाचण्यात मिळणारा आनंद इतका रसमय असतो की त्याची तुलना ऐकून समजण्याशी करता येत नाही, कारण वाड्:मयाची रचना ही मूलत: वाचण्यासाठीच केली जाते. साहित्य वाचून त्याचे मूल्य आत्मसात करताना जी कौशल्ये, क्षमता आणि विचार विकसित होतात ते मात्र ऐकून होणे शक्य नाही. सुप्रसिध्द लेखकांचे वाड्:मय  नावाजलेल्या कलाकारांच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित करुन, ध्वनिमुद्रित पुस्तिका (ऑडियो बुक्स) तयार करणे ही अत्यंत खर्चिक बाब असणार आहे. तसेच वाड्:मय वाचन हे प्रशिक्षित शिक्षकच प्रभावीपणे करू शकतात अशी या कार्यालयाची धारणा आहे असे म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.