महापालिका कर्मचाऱ्यांनो व्यसनापासून दूर रहा: प्रशासनाने केले आवाहन

120
जर तंबाखूचे व्यसन वेळीच थांबविले नाही तर सन २०३० पर्यंत जगातील तब्बल शंभर कोटी लोक तंबाखू व तत्सम व्यसनांपासून होणाऱ्या रोगांमुळे जीवाला मुकण्याची शक्यता आहे. त्यामध्ये २० ते ३० वर्षे वयोगटातील ४० टक्के लोक असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्याचा संदर्भ देत तंबाखूचा हा हल्ला रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतः व्यसनापासून दूर राहतानाच, आपल्या कौटुंबिक परिघात, मित्र-मंडळींनाही व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे, असे आवाहन सहआयुक्त (सामान्य प्रशासन)  मिलीन सावंत यांनी  केले आहे.
जागतिक तंबाखू विरोधी दिन मंगळवारी ३१ मे २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तंबाखू व व्यसनमुक्ती विषयक जनजागृतीसाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपाहारगृहात भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे सहआयुक्त (सामान्य प्रशासन)  मिलीन सावंत यांनी  सोमवारी ३० मे २०२२ उद्घाटन केले. या प्रसंगी त्यांनी आवाहन केले.

व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, कामगार विभाग, महाराष्ट्र राज्य शासनाचा उपक्रम असलेले नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तंबाखूच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, त्यापासून जगाला असलेला धोका याविषयी सचित्र माहिती देणारे तसेच तंबाखू प्रतिबंधासाठी असणा-या कायद्याची माहिती, तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी इत्यादींबाबत या प्रदर्शनातून माहिती देण्यात आली आहे. याप्रसंगी सहआयुक्त  मिलीन सावंत यांनी उपस्थित सर्व अधिकारी – कर्मचा-यांना व्यसनांपासून लांब राहण्याची तसेच व्यसनमुक्तीची शपथदेखील दिली.
( हेही वाचा: मेट्रो स्थानकांपर्यंत नवे ‘बेस्ट’ मार्ग सुरू करण्याची मागणी )

याप्रसंगी महानगरपालिकेचे प्रमुख कामगार अधिकारी  सहदेव मोहिते, सहप्रमुख कामगार अधिकारी नितीन बडगुजर यांच्यासह नशाबंदी मंडळातर्फे मिलिंद पाटील, रवींद्र गमरे, अशोक लांडगे, प्रियांका सवाखंडे व दिशा कळंबे यांचीही उपस्थिती होती. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.