महापालिका रुग्णालयांचे ऑनलाईन अ‍ॅप? लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी

110

आजच्या आधुनिक काळात विविध क्षेत्रात ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जात असून या प्रणालीचा वापर रुग्णालयांमध्ये होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील सुविधांची संपुर्ण माहिती मिळण्यासाठी डिजिटलच्य माध्यमातून ऑनलाईन अ‍ॅप विकसित करण्याची मागणी होत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका रुग्णालयांची माहिती डिजिटल केल्यास रुग्णांचा आणि डॉक्टरांचा त्रास कमी होईल.

इंटरनेट वापरण्यात भारताचा दुसरा क्रमांक

आपल्या देशात इंटरनेट स्वस्त झाल्याने इंटरनेट वापरणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जगामध्ये सर्वात जास्त इंटरनेट वापरण्यात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. नागरिकांच्या सुविधेकरिता मुंबई महानगरपालिकेच्या बहुतांश सेवा आता ई-गव्हर्नन्स आणि एम -गव्हर्नन्स मार्फत ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने स्वत:च्या रुग्णालयांमधील सुविधांची माहिती डिजिटलच्या माध्यमातून ऑनलाईन अ‍ॅप विकसित करून दिल्यास प्रशासन आणि नागरिक यांच्यात एक प्रभावी दुवा तयार होईल, असे स्पष्ट करत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी अशाप्रकारे अ‍ॅप विकसित करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

(हेही वाचा – राणेंचे सत्ताबदलाचे भाकीत! शरद पवार तडकाफडकी दिल्लीत)

मर्यादित भौगोलिक क्षेत्र आणि मोठ्या लोकसंख्येसारख्या आव्हानांसह एकापेक्षा अधिक नियोजन प्राधिकरण असणारे मुंबई हे एक गतिमान शहर आहे. या शहरासाठी मुंबई महानगरपालिका ही स्थानिक प्रशासन यंत्रणा असून इतर नियोजन प्राधिकरणांसमवेत शहराला नागरी सेवा सुविधा पुरविते. शहरातील नागरी सेवा सुविधा सुरळीत व सुव्यवस्थित ठेवण्यासाठी महानगरपालिकेतील काही विभाग अहोरात्र काम करीत असतात. त्यामधील महत्वाची मानली जाणारी आरोग्य सेवांचा देखील समाविष्ट होतो.

या अ‍ॅपवर तुम्हाला डिस्काऊंट मिळणार

लॉकडाऊनमुळे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली आहे. बिल पेमेंट रिचार्ज, ऑनलाईन ट्युशन, इत्यादी सर्व ऑनलाईन झाले असून पूर्वी औषधे घ्यायची असतील, तरी आपल्याला औषधांच्या दुकानांमध्ये जावे लागत असे. पण आता या डिजिटल युगात तुम्ही घरात बसून सुद्धा आपल्या हवी असलेली औषधे ऑनलाईन मागवू शकतो. तसेच ऑनलाईन औषधे मागवणे काही कठीण नाही, फक्त डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन त्या अ‍ॅपवर सबमिट करून तुमच्या घरचा पत्ता देऊन तुम्ही औषधे मागवू शकता. तसेच या अ‍ॅपवर तुम्हाला डिस्काऊंट सुद्धा मिळतो. तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकता. या ऑनलाईन अ‍ॅपमध्ये विविध हॉस्पिटल्समधील विविध विभाग व आजारांच्या संबंधित ओ. पी. डी. कोणत्या इमारतीमध्ये व कोणत्या मजल्यावर आहेत. तसेच ओ.पी.डी. मधील कार्यरत असणा-या डॉक्टरांच्या येण्याच्या वेळा व इतरही सुविधांबाबतची सर्वकष माहिती या समाविष्ट केल्यास, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विविध विभाग आणि ओ.पी.डी. शोधण्यात आणि डॉक्टरांची प्रतिक्षा करण्यात आपला तासनतास वेळ वाया जाणार नाही. ज्यामुळे अनेक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.