Hawkers Policy : नगर पथविक्रेता समिती निवडणूक; ४३ इच्‍छुक उमेदवारांनी घेतला सहभाग

863
Hawkers Policy : नगर पथविक्रेता समिती निवडणूक; ४३ इच्‍छुक उमेदवारांनी घेतला सहभाग

नगर पथविक्रेता समितीची निवडणूक २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून यासाठी ५ आणि ६ ऑगस्‍ट २०२४ रोजी नामनिर्देशन पत्र वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही नामनिर्देशन पत्रे कशी भरावयाची, कोणती कागदपत्रे जोडावयाची याबाबत इच्‍छुक उमेदवारांसाठी प्रमुख नगर पथविक्रेता समिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍यामार्फत मार्गदर्शन शिबीर नुकतेच घेण्‍यात आले. त्‍यात ४३ इच्‍छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. (Hawkers Policy)

केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार, नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यात येत आहे. मुंबईत १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक समितीतील सदस्यांची एकूण संख्या ८ आहे. यामध्ये अनुसूचित जाती (१), अनुसूचित जमाती (१), अल्पसंख्याक (१), इतर मागासवर्ग (१), दिव्यांग (१) आणि खुला (३) या प्रवर्गांनुसार सदस्य रचना निश्चित करण्यात आली आहे. यापैकी एक तृतियांश म्हणजेच ३ जागा प्रत्येक समितीत महिलांसाठी आरक्षित आहेत. मुंबईतील नोंदणीकृत नगर पथविक्रेता मतदारांची एकूण संख्या ३२ हजार ४१५ आहे. (Hawkers Policy)

(हेही वाचा – Love Jihad : उल्हासनगरमधील दृष्टी झाली आयेशा; धर्मांतरासाठी मुसलमानांनी गाठली खालची पातळी)

नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीच्‍या कार्यक्रमानुसार, नामनिर्देशन पत्राचे वाटप ५ ते ६ ऑगस्ट २०२४ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान करण्‍यात आले. ही नामनिर्देशन पत्रे कशी भरावयाची, कोणती कागदपत्रे जोडावयाची याबाबत इच्‍छुक उमेदवारांसाठी प्रमुख नगर पथविक्रेता समिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍यामार्फत ९ ऑगस्‍ट २०२४ रोजी मार्गदर्शन शिबीर घेण्‍यात आले. त्‍याचा लाभ ४३ उमेदवारांनी घेतला. इच्‍छुक उमेदवारांना उद्भवलेल्‍या शंकांचे निरसन करण्‍यात आले. तसेच, घोषणापत्र, नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड, शपथपत्र, चलन पावती आदी कागदपत्रे नामनिर्देशन अर्जासमवेत कशी जोडावयाची याबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. (Hawkers Policy)

प्राप्त नामनिर्देशन पत्राची छानणी १४ ऑगस्ट २०२४ (सकाळी ११ ते प्रक्रिया संपेपर्यंत) करण्‍यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची यादी १६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान दिनांक २९ ऑगस्ट २०२४ (सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत) रोजी तर त्‍याच दिवशी म्‍हणजे दिनांक २९ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ५ वाजेनंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. निवडणूक निकाल दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी मतमोजणीनंतर जाहीर करण्‍यात येणार आहे. (Hawkers Policy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.