Amit Satam : महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक अमित साटम यांना राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक

मुंबई महानगरपालिकेच्‍या राजे एडवर्ड स्‍मारक (के. ई. एम) रुग्णालयातील सुरक्षा रक्षक अमित साटम यांनी छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्‍याच झालेल्या 'भारत श्री २०२३' राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ८० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.

520
Amit Satam : महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक अमित साटम यांना राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक
Amit Satam : महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक अमित साटम यांना राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक

मुंबई महानगरपालिकेच्‍या राजे एडवर्ड स्‍मारक (K. E. M) रुग्णालयातील सुरक्षा रक्षक अमित साटम यांनी छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्‍याच झालेल्या ‘भारत श्री २०२३’ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ८० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. (Amit Satam)

3

महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध कलागुणांना संधी देण्‍यासाठी महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविण्‍यात येतात. त्‍यात अभिनय-नृत्‍यापासून विविध क्रीडा प्रकारांसह शरीरसौष्ठव आदींचा देखील समावेश आहे. राजे एडवर्ड स्‍मारक (K. E. M) रुग्णालयातील सुरक्षा रक्षक अमीत साटम यांनी किशोरवयापासूनच शरीरसौष्ठवाचा छंद जोपासला आहे. महानगरपालिकेत रुजू झाल्‍यानंतर सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रोत्‍साहनामुळे त्‍यांना अधिक प्रेरणा मिळाली. विविध स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होत त्‍यांनी पारितोषिके पटकावली आहेत. (Amit Satam)

3 1

(हेही वाचा – Pune University ला JNUची लागण; का बनले वातावरण तणावग्रस्त? )

छत्रपती संभाजीनगर येथे २६ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘भारत श्री २०२३’ ही राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्‍पर्धा पार पडली. या स्पर्धेत ८० किलो वजनी गटात साटम यांनी रौप्यपदक पटकावले. या उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. या यशाबद्दल अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (सामान्‍य प्रशासन) मिलीन सावंत, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (उद्यान विभाग) किशोर गांधी यांच्‍या हस्‍ते व प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी (महानगरपालिका मुख्‍यालय) कैलास सुपे आदींच्‍या उपस्थितीत साटम यांचा सत्‍कार करण्‍यात आला. (Amit Satam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.