Kichen Garden शहरातील महापालिका विद्यार्थी शेती शिकले, उपनगरांतील मुले कधी शिकणार

471
Kichen Garden शहरातील महापालिका विद्यार्थी शेती शिकले, उपनगरांतील मुले कधी शिकणार
Kichen Garden शहरातील महापालिका विद्यार्थी शेती शिकले, उपनगरांतील मुले कधी शिकणार
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या उद्देशाने महापालिका शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर किचन गार्डनची (Kichen Garden) संकल्पना राबवण्यात येत असून शहर भागातील एकूण १०० शाळांमध्ये किचन गार्डन तयार केली आहे. या किचन गार्डनच्या (Kichen Garden) माध्यमातून महापालिका शाळांमधील विद्यार्थी हे भाज्यांची शेती करायला शिकले असून शहरांतील महापालिका शाळांमध्ये शेतीचे धडे दिले जात असले तरी उपनगरांतील शाळांमधील विद्यार्थी मात्र शेतीचा विषय समजून घेत शेती करण्याचा अनुभव घेण्यापासून मात्र वंचित राहिले आहेत.

WhatsApp Image 2024 09 28 at 7.50.15 PM scaled

महापालिका शिक्षण विभागांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना ऑरगॉनिक फार्मिंग अर्थात किचन गार्डनचे (Kichen Garden) कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी विषयांतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके देण्याबाबत महापालिका शिक्षण विभागातील १०० शालेय इमारतीमध्ये किचन गार्डन (Kichen Garden) प्रकल्प स्थापन करण्यात येत आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १०० शालेय इमारतींमध्ये १०० किचन गार्डन (Kichen Garden) प्रकल्प स्थापन करण्याच्या कामांसाठी मागवलेल्य निविदेमध्ये प्रोबीट प्लस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली. यासाठी दोन कोटी ५१ लाख रुपये खर्च केले आहेत.

(हेही वाचा – Election Commission : आता मतदानांच्या दिवशी असंघटीत कामगारांना मिळणार भरपगारी रजा)

या नियुक्त केलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रत्येक शाळांमध्ये सॉईल लेस ऑरगॅनिस मेटीयम हे प्रति शाळा हे ८०० किलो तसेच ऑरगॅनिक प्लांट प्राटेक्शन किट, ग्रीन नेट पॅकींग, सिड पॅकेट्स, शेण, हँड स्प्रे, ड्रीप मोटर, कॉमन युपीव्हीसी पाईप वॉटर सप्लाय, रेन वॉटर पाईप, स्प्रिंकलर पाईप, पॅकींग बॅग, बॉटल्स आणि कॅन आदी प्रकारचे साहित्य व प्रशिक्षण पुरवले जाणार आहे.

WhatsApp Image 2024 09 28 at 7.50.16 PM

या शालेय किचनची संकल्पना राबवण्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळाले होते, तर महापालिकेने दीड कोटी रुपये खर्च केले होते. त्यानुसार शहर भागांमधील १०० शाळांमध्ये गार्डन किचनचे वर्ग सुरु होऊन अनेक शाळांमध्ये भाज्यांचे पिक घेतले जात आहे. यामध्ये लागणाऱ्या भाज्यांचा वापर मध्यान्ह भोजत केला जातो, तसेच काकडी, गाजर हे मुलांना खिचडीसोबत खाण्यास दिले जातात,असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी? काय म्हणाले, Election Commissioner of India)

एरवी शेतीपासून अलिप्त राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजावून सांगणे. त्यामध्ये पर्यावरण आणि शेती यासारख्या क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवून या क्षेत्रात कारकीर्दीसाठी त्यांचे मन वळवणे, हादेखील उपक्रमाचा उद्देश आहे. म्हणूनच प्राथमिक अवस्थेतच पर्यावरणात घडणाऱ्या बदलांसाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे, हा उपक्रमाचा उद्देश आहे. तत्कालिन उपायुक्त अजित कुंभार आणि अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी यासाठी खूप मेहनत घेतली होती. किचन गार्डनिंग हे एक तंत्रज्ञान असून शहरातील विद्यार्थ्यांना सेंद्रीय पध्दतीने पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांचे महत्व समजेल आणि विद्यार्थी जंक फुडच्या दुष्पपरिणामापासून दूर होऊन त्यांना सदृढ, निरोगी आरोग्य प्राप्त होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे केवळ पैसा आणि वेळ वाचतो असे नाही तर निरोगी, उपयुक्त आणि पर्यावरणपुरक भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो,असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

WhatsApp Image 2024 09 28 at 7.50.17 PM

मात्र, शहर भागांतील १०० शाळांमध्ये गार्डन किचनची (Kichen Garden)  संकल्पना राबवण्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली असली तरी उपनगरांतील शाळांमध्ये ही संकल्पना राबवण्यासाठी शासनाकडून मदत मिळत नसल्याने उपनगरांतील शाळांमधील विद्यार्थी हे या किचन गार्डनपासून (Kichen Garden) वंचित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उपनगरांतील महापालिका शाळांमध्ये कधी किचन गार्डन संकल्पना राबवली जाणार असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.