पाळीव श्वान मालकांवर आता महापालिका पथकाचा वॉच! अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

पुणे शहरात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पदपथ उभारले आहेत. शहराच्या अनेक भागांत नागरिक सकाळी या पदपथांचा चालण्यासाठी वापर करतात. मात्र, त्यावेळी शहरातील अनेक नागरिक पाळीव श्वानांनाही फिरण्यासाठी घेऊन येतात. हे श्वान पदपथ तसेच भर रस्त्यातच घाण करतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अस्वच्छता करणाऱ्या श्वान मालकांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या आरोग्य निरिक्षकांना शहरात रोज सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना २०२३ ठरणार लाभदायक; महागाई भत्ता किती वाढेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती)

पाचशे रुपये दंड

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडून अशा प्रकारची पहिलीच कारवाई करण्यात आली असून, सहा ते सात श्वानमालकांकडून अस्वच्छते प्रकरणी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईचे सकाळी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.

फक्त ५ हजार लोकांनी घेतले परवाने

पुण्यात मोठ्या प्रमाणात नागरिक श्वान पाळतात. परंतु त्यासाठी महापालिकेचा परवाना घेणे बंधनाकारक आहे. हा परवाना घेतानाचा श्वान सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही याची अट आलेली असते. मात्र पुण्यात जवळपास १ लाखाच्या जवळपास श्वान असूनही केवळ ५ हजार नागरिकांना परवाने घेतलेले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here