पुण्यात भरदिवसा रस्त्यावर पोलिस हवालदाराचा खून!

या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रवीण श्रीनिवास महाजन (३४) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, जिल्ह्यातील  कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य व्यवस्था जशी शर्थीचे प्रयत्न करत आहे, तसे पोलिस व्यवस्थाही लॉकडाऊनचे कडक अंमलबजावणी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे, अशा परिस्थिती पुण्यातील रस्त्यावर एका पोलिस हवालदाराचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुंड प्रवीण महाजनविरोधात गुन्हा दाखल!

बुधवार पेठ येथील फरसखाना पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदार समीर सय्यद यांची ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण श्रीनिवास महाजन (३४) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरसखाना पोलिस ठाण्याचे पोलिस उप-निरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी, ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता त्यांना फोनवरून माहिती देण्यात आली कि, केंजळ चौकाच्या नजीक एका हॉटेलच्या समोर एका व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार करण्यात आले आहे. त्यानंतर उपनिरीक्षक सावंत तात्काळ घटनास्थळी पोहचले. तेव्हा त्याठिकाणी घायाळ व्यक्ती त्यांच्याच पोलिस ठाण्यातील हवालदार समीर सय्यद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हवालदार सय्यद यांना रक्ताने माखलेल्या अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले, परंतु त्यांच्यावर उपचार करत असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली असता हा खून गुंड प्रवीण महाजन याने केल्याचे समजले, पोलिसांनी प्रवीण महाजनच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

(हेही वाचा : लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिस उपअधीक्षक रस्त्यावर! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here