दुर्गेश जयवंत परुळकर
देशाच्या विभाजनाच्या वेळची गोष्ट आहे. कश्मीरवर पाकिस्तानच्या टोळीवाल्याने हल्ला केला. त्या वेळी काश्मीरचे महाराज हरिसिंग यांनी भारत सरकारकडे सैनिकी सहाय्य मागितले. भारतीय सैन्याने आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना मागे पिटाळून लावले. काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांचा विजय होत होता. त्याचवेळी माउंटबॅटन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नेहरूंनी १ जानेवारी १९४८ या दिवशी हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाकडे नेला आणि भारतीय सैन्याच्या विजयाला अपशकुन केला. (Murshidabad Violence)
संयुक्त राष्ट्र संघटना (United Nations Organization) साम्राज्यवाद्यांची हस्तक होती. तिने वीस दिवसानंतर म्हणजे २० जानेवारी १९४८ या दिवशी काश्मीर प्रश्न विचारार्थी घेतला; पण अखेरीस भारताच्या फाळणीला कौल देऊन पाकिस्तानला मान्यता दिली.
संयुक्त राष्ट्र संघाची कार्यपद्धती कशी आहे, याबाबत डॉ. साल्व्ह डी मॅडेरियन लिहितात, ” संयुक्त राष्ट्र संघटनेपुढे दोन लहान राष्ट्रातील वाद गेला, तर तो वादच अदृश्य होतो. हा वाद जर एका लहान आणि दुसऱ्या महान राज्यात असेल, तर ते लहान राज्य अदृश्य होते. हा वाद जर दोन महान राज्यात असेल, तर संयुक्त राष्ट्र संघटनाच अदृश्य होते.”
वि.ग. देसाई सांगतात, “संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे जगात नवीन जन्माला आलेल्या आणि मृत पावलेल्या राज्यांची नोंद करणारी विश्व महापालिका आहे.”
आपले सैन्य कश्मीर मुक्त करण्याचा निर्धाराने लढत असताना मनाने आणि बुद्धीने दुर्बळ असलेल्या नेहरूंनी अशा फसव्या संघटनेकडे आपला वाद नेला आणि कश्मीरचेही विभाजन केले. एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानाच्या पदरात टाकला. उर्वरित काश्मीरचे पंतप्रधानपद शेख अब्दुल्ला यांना दिले आणि निर्वासित हिंदूंना काश्मीरमध्ये बसण्यास बंदी करून काश्मीर हा मुस्लिम बहुसंख्य प्रांत ठेवण्याचे राष्ट्रीय पाप स्वतःला निधर्मीवादी म्हणणाऱ्या आणि पाकिस्तानचा पक्ष घेणाऱ्या पौरूषहीन शासनाने केले.
त्या वेळी बीरभूम या पश्चिम बंगालमधील जिल्ह्यात पोटनिवडणूक होणार होती. हिंदू महासभा पक्षाचा प्रचार करण्यासाठी बंगाल मधल्या हिंदू महासभेने सावरकरांना आग्रहाचे निमंत्रण पाठवले होते; पण सावरकरांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते प्रचारासाठी तिकडे जाऊ शकले नाहीत; मात्र त्यांनी हिंदू मतदारांना सावधतेचा इशारा देणारा एक संदेश पाठवला.
“मतदारांनी हिंदू महासभेला मत दिले तर त्यांना लाभदायक ठरणार आहे. सध्या जो वाद काँग्रेस आणि हिंदू महासभेत निर्माण झाला आहे, तो दोन व्यक्तींमधला किंवा दोन पक्षांमधला वाद नाही. तो दोन विचारसरणींमधला वाद आहे. काँग्रेस हिंदूंची बाजू कधीच मांडू शकत नाही. ती स्वतःला हिंदूंचे प्रतिनिधी म्हणवत नाही. हिंदूंचा प्रतिकार करण्यासाठी सत्ता हाती घेणे, अनेक नौखाली आणि पाकिस्तान यांच्या आपत्तीत हिंदू सापडले. कारण त्यांनी काँग्रेसला मते दिली. तशीच मते त्यांनी पुढेही काँग्रेसलाच दिली तर त्यांना अखंड पाकिस्तानात राहावे लागेल. सु-हावर्दी, आझाद इत्यादी मुसलमानांना सत्ताधीश केलेच पाहिजे अशी अट काँग्रेसच्या ध्येयधोरणात आहे. काँग्रेसला दिलेले मत म्हणजे अखंड पाकिस्तानला दिलेले मत असे समजावे. यातून काय ते समजा आणि हिंदूंना निवडून द्या.”
यानंतर सावरकरांनी एक विद्युत संदेश पश्चिम बंगालमधील आपल्या हिंदू बांधवांना पाठवला. वर्ष १९४७ मधला तो संदेश त्या वेळी सुद्धा कोणी ऐकला नाही आणि त्यानंतर आजच्या क्षणापर्यंत सावरकरांच्या या संदेशाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्याचे फळ आपल्याला भोगावे लागत आहे.
सावरकरांनी त्या संदेशात लिहिले,…..” पूर्व बंगालमधील मुसलमान, पश्चिम बंगालवर चढाई करण्याच्या हेतूने सामर्थ्यावान होत आहेत. त्यांच्यावर मात करायची असेल तर पश्चिम बंगाल मध्ये एक अत्यंत सामर्थ्यशाली हिंदू राज्य आपल्याला निर्माण करायला पाहिजे. फसव्या राष्ट्रवादावर आधारलेली काँग्रेसची विचारसरणी सत्तेतील महत्त्वाच्या स्थानी मुसलमानांना नियुक्त करण्यास बांधलेली आहे. ती अशा प्रकारचे सामर्थ्यशाली हिंदू राज्य निर्माण करू इच्छित नाही आणि कधी तसा प्रयत्नही करणार नाही. हे कार्य केवळ हिंदू संघटनी विचारसरणी करू शकेल आणि तीच पूर्व बंगालमधील हिंदूंना जशी वागणूक मिळेल तशीच वागणूक पश्चिम बंगालमधील मुसलमानांना देऊन पूर्व बंगालमधील हिंदूंचे ही संरक्षण करू शकेल. तेव्हा दोन्ही बंगालमध्ये हिंदूंचे नौखालीसारखे भयानक हत्याकांड होऊ नये, यासाठी बीरभूम आणि अन्य निवडणुकीतही हिंदूंनी हिंदू महासभेलाच मते द्यावीत.”
सावरकरांनी सांगितलेल्या पश्चिम बंगालमधील (west bengal) बीरभूम या जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व जाणून घेऊया. म्हणजे सावरकर पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे सामर्थ्यशाली राज्य निर्माण करा, असा संदेश हिंदूंना का देतात ते ध्यानात येईल.
बीरभूम हा पश्चिम बंगाल मधला एक जिल्हा या जिल्ह्यात बोलपुर रामपूरहाट आणि सैंथिया अशी महत्वपूर्ण शहरे आहेत. झारखंड राज्यातील जाणताडा दुमका आणि पाकुड हे जिल्हे बीरभूम जिल्ह्याच्या पश्चिमेला आहेत. बर्धमान आणि मुर्शिदाबाद याच जिल्ह्याला लागून आहेत.
सध्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात काय प्रकार चालला आहे तो आपल्याला ज्ञात आहेच. सावरकरांच्या या इशाऱ्याकडे, संदेशाकडे हिंदूंनी वेळीच लक्ष दिले असते आणि सावरकर सांगतात त्याप्रमाणे पश्चिम बंगाल सामर्थ्यशाली हिंदू राज्य निर्माण केले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती.
सावरकरांसारखा द्रष्टा नेता आपल्याला लाभला, पण आपण त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काहीही केले नाही. त्यामुळे मुर्शिदापूर जिल्ह्यातून हिंदूंना पलायन करण्याची वेळ आली. एवढेच नाही तर बांगलादेशातूनही हिंदूंची जी वाताहत झाली तीही आपल्याला थांबवता आली असती. पण अजूनही आपण सामर्थ्यशाली झालो नाही, प्रतिकार करण्याचे आपण धाडस केले नाही तर आपल्याला इस्लामिक राष्ट्रात धर्म परिवर्तन करून राहण्याची वेळ येईल. हे टाळायचे असेल तर सावरकरांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या संदेशाचा लाभ आपल्याला घ्यावा लागेल. सर्व हिंदूंना ती सद्बुद्धी होवो एवढीच प्रार्थना! (Murshidabad Violence)
( संदर्भ- स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात पर्व १९४७-१९६६, लेखक-आचार्य बाळाराव सावरकर, प्रकाशक-स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर, मुंबई)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community