तमिळनाडूतील (Tamil Nadu) मदुराई (Madurai) येथील पवित्र थिरुपरनकुंद्रम (Thiruparankundram) टेकडीवर मुस्लिमांना शिजवलेले मांस नेण्यास न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर हिंदू (Hindu) संघटनांनी मोठा आक्रोष व्यक्त केला आहे. मदुराईच्या (Madurai) पलकनाथममध्ये हजारो हिंदूंनी (Hindu) यावेळी आंदोलने केल्याचे निदर्शनास आले आहे. प्राचीन मुरुगन मंदिर इथल्या थिरुपरकुंद्रम टेकडीवर वक्फ बोर्डाने (Waqf Board) दावा केला आहे.
( हेही वाचा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव; कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा उपक्रम)
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुरुगन मंदिराच्या अगदी शेजारी असलेल्या या टेकडीवर मुस्लिम समाजाने एक दरगाह (Dargah) बांधला आहे. त्यांना कत्तलीसाठी बकरे आणि कोंबडे तिथे घेऊन जायचे आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठा गदारोळ सुरू असून पोलिसांनी जिवंत बोकड किंवा कोंबड्यांचा बळी देण्यावर बंदी घातली आहे. मात्र, मुस्लिम (Muslim) तेथे शिजवलेले मांस घेऊन ते खाऊ शकतात, असा निर्णय न्यायालयाने दिल्याने हिंदू समाजातील लोकांनी नाराजी व्यक्त केले आहे.
दरम्यान हिंदू (Hindu) संघटनांचा विरोध पाहता, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी परिसरात कलम १४४ लागू केले आणि हिंदू (Hindu) समुदायाच्या लोकांना प्रवेशावर बंदी घातली. यानंतर हिंदू (Hindu) संघटनेने याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याची परवानगी मागितली. निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर तेथे ३५०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community