संगीत कारंजे सांगणार नागपूरचा इतिहास- नितीन गडकरी

105

नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे नागपूरचा इतिहास सांगणार असून, या इतिहासाची हिंदी मधली कॉमेंट्री अमिताभ बच्चन आणि मराठीतली कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या आवाजात राहील अशी माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.

पुष्पविविधताही वाढवण्यात येणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्पाची उद्घाटनापूर्वी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांसह पाहणी केली ,त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते निधी मधून 30 कोटी रुपये पंजाबराव कृषी विद्यापीठाला देण्यात आले असून, फुटाळ्याजवळील विद्यापीठ उद्यानात देश-विदेशातील पुष्पांच्या जाती आणून येथील पुष्पविविधता वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा काय हाटील, काय रूम, काय पैसा…शिंदे गटावर किती खर्च झाला? )

गडकरींनी केली पाहणी 

विशेष म्हणजे हे कारंजे पाहण्यासाठी फुटाळा तलावाजवळ दर्शक गॅलरी ही 400 आसन क्षमतेची राहणार असून फुटाळ्याच्या पुढेच बारा मजली फूड-प्लाझा 1100 वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह उभारण्यात येणार आहेत. या कारंजाच्या निर्मितीसाठी विश्वस्तरावरील आर्किटेक्ट नागपूरात आले असून, फाऊंटनच्या हार्डवेअरची प्राथामिक चाचणी शुक्रवारी गडकरी केली. या फाऊंटनच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो तसेच या प्रकल्पाचे कंत्राटदार यांचेही आभार गडकरी यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित तामिळ चित्रपट क्षेत्रातील गायिका रेवती यांनी सुद्धा या प्रकल्पाच्या संगीत नियोजनाविषयी माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.