जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती म्हणजे एलॉन मस्क. मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये मस्क यांनी ट्विटर विकत घेतले होते. कर्मचाऱ्यांची कपात, अचानक लॉगो बदलणे, ब्लू टिक काढून टाकणे यासारख्या गोष्टींमुळे ट्विटर सतत चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या मालकांनी नवीन घोषणा केली आहे. या घोषणेचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. कारण याच्यामुळे क्रिएटर्स आणि युजर या दोघांचा फायदा होणार आहे.
नवीन सुविधा काय?
२९ एप्रिलला मस्क यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमुळे सगळ्यांचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी एक फीचर लाँच केले होते. त्या फीचरमुळे क्रिएटर्सना त्यांच्या कंटेटसाठी ट्विटरवरच पैसे आकारणे शक्य झाले होते. युजरला एका महिन्यापासून ते वर्षभरापर्यंतचे सबक्रिप्शन विकत घेणे यामुळे शक्य झाले होते. मस्क यांनी केलेली ही घोषणा सबक्रिप्शनच्या या सुविधेला आणखी सोयीस्कर करणार आहे.
मस्क यांचा ‘मधला’ मार्ग
मस्क यांचे नवीन फर्मान मीडिया पब्लिशर्सशी संबंधित आहे. आतापर्यंत वाचकांकडून महिन्याभरासाठी शुल्क आकारण्यावाचून मीडिया पब्लिशर्सकडे दुसरा पर्याय नव्हता. या सबक्रिप्शनचे पैसे जास्त असल्यामुळे अनेक युजर्सना ते विकत घेता येत नाही. यावर मस्क यांनी तोडगा काढला आहे. या उपायामुळे दोघांचाही फायदा होणार आहे.
आता प्रत्येक पोस्टसाठी मीडिया पब्लिशरला स्वतंत्र पैसे आकारता येणार आहेत. ट्विटरने त्यांना प्रति क्लिकवर युजर्सकडून शुल्क घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मंथली मेंबरशीपसाठी साइन अप करायची गरज नाही. जेव्हा कधी एखादी पोस्ट वाचायची इच्छा होईल, तेव्हा त्याचे विशिष्ट पैसे द्यायचे आणि पोस्ट वाचून घ्यायची. मे महिन्यापासून ही नवीन सुविधा सुरू होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community