Assam मध्ये बेकायदा बांधकाम तोडणाऱ्या पथकावर मुसलमानांचा हल्ला; अनेक पोलीस जखमी

प्रशासनाने त्यांना घरे रिकामी करण्यासाठी अनेक नोटिसा बजावल्या. मात्र रहिवाशांनी स्वत:हून जागा रिकामी करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने तोडकाम मोहीम सुरू केली.

157

गुवाहाटीजवळील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याला गुरुवारी हिंसक वळण लागले, कारण मुसलमानांच्या झुंडीने अधिकाऱ्यांवर हल्ला केला, त्यात अनेक पोलिस जखमी झाले. नंतर गुवाहाटीच्या (Assam) बाहेरील सोनापूर येथे झालेल्या या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन हल्लेखोरांचा मृत्यू झाला. हैदर अली आणि जुवाहद अली अशी दोन मृतांची नावे असून, गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी गुवाहाटीच्या पूर्व उपनगरातील सोनापूर भागातील कचुतली गावात पोहोचले तेव्हा हिंसाचार सुरू झाला. परिसरातील 100 बिघा भूखंडावरून बेकायदेशीर बांधकामे हटवण्याची मोहीम राबविण्यात आली. मुस्लीम समाजातील सुमारे 150 लोक या परिसरातील सरकारी जमिनीवर स्थायिक झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कोणतीही घटना न घडता निष्कासन सुरू होते, मात्र गुरुवारी हजाराहून अधिक लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रांनी सज्ज पोलिसांवर हल्ला केल्याने परिस्थिती चिघळली.

जमावाने पोलिस कर्मचारी आणि वाहनांवरही दगडफेक करून अनेक वाहनांचे नुकसान केले. या हल्ल्यात एका महिला कॉन्स्टेबलसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाच्या हल्ल्यात महसूल मंडळ अधिकारी नितुल खतोनियार हेही जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणता न आल्याने पोलिसांना जमावावर गोळीबार करावा लागला आणि अनेक हल्लेखोरांना गोळ्या घातल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमाव इतका हिंसक होता की पोलिसांना घटनास्थळावरून पळ काढावा लागला. (Assam)

(हेही वाचा Jitendra Awhad यांचे ‘ते’ विधान समाजात तणाव निर्माण करणारेच; उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी घेण्याचे आदेश)

जखमींना सोनापूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे हैदर अली आणि जुवाहीद अली यांचा गोळी लागून मृत्यू झाला. सर्व जखमींना नंतर गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, त्यात शाहजहान अलीचा समावेश आहे. जखमी महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, जमावामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. जमावाने दगड, चाकू, काठ्या आणि इतर शस्त्रे घेऊन हल्ला करत होता, तेव्हा पोलीस केवळ स्वतःचे रक्षण करत होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप या घटनेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कोसुटोली येथील परिस्थिती तणावपूर्ण असून, परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Assam)

अनेक नोटिस देऊनही रहिवाशांनी केलेले दुर्लक्ष 

बेकायदा वसाहतींनी सरकारी जमीन आणि आदिवासी पट्ट्यातील भूभागावर कब्जा केल्याची स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर ते बांधकाम पडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. कलंग आणि दिगारू नद्यांच्या जलमार्गाचा वापर करून संशयित अवैध परदेशी नागरिक या भागात येत असून सरकारी जमिनीवर घरे बांधत असल्याचे आढळून आले. तक्रारींनंतर प्रशासनाने परिसरात सर्वेक्षण केले, कागदपत्रे तपासली असता, सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांना घरे रिकामी करण्यासाठी अनेक नोटिसा बजावल्या. मात्र रहिवाशांनी स्वत:हून जागा रिकामी करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने तोडकाम मोहीम सुरू केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.