पूर्व भारतातील त्रिपुरा (Tripura) येथे धार्मिक तणाव निर्माण झाल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. त्याठिकाणी इस्लामिक कट्टरपंथींच्या जमावाने हिंदूंच्या घरांवर आणि दुकानावर हल्ला (Attacks on Hindus) केला. यावेळी गोळीबारी ही करण्यात आला.ज्यामध्ये अनेक लोग जखमी झाले आहेत. हल्ला रोखणाऱ्या पोलिसांनाही यावेळी टार्गेट करण्यात आले. हिंसेत (Attacks on Hindus)एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन लोक जखमी आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना दि. ९ ऑक्टोबर रोजी घडली.
( हेही वाचा : Prithviraj Chavan यांना निवडणूक जड जाणार ? सांगली पॅटर्न साताऱ्यातही राबवणार !)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना त्रिपुरा (Tripura) जिल्ह्याच्या कदमतला बाजारात घडली. दि. ६ ऑक्टोबर रोजी दुर्गापुजेसाठी हिंदू (Hindu) समाज रस्त्यावर वर्गणी मागत होते. तेव्हा एक मुस्लिम ड्रायव्हर त्यांच्याशी वाद घालत होता. थोड्या वेळात त्या ड्रायव्हरच्या समर्थनासाठी आसपासच्या परिसरातील इस्लामिक कट्टरपंथी जमा झाले. त्यांच्या हातात लाठी- काठी आणि अन्य हत्यारं होते. त्यांनी फक्त वर्गणी मागणाऱ्या हिंदूवर हल्ला (Attacks on Hindus)केला नाही तर आसपास राहणाऱ्या रहिवाश्यांवर ही हल्ला (Attacks on Hindus) केला.
दरम्यान कट्टरपंथींनी महिलांसोबत गैरवर्तन केले. त्यांच्या घरांमध्ये तोडफोड केली आणि दुकानांची लूटपाट केली. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा इस्लामिक कट्टरपंथींनी पोलिसांवर ही हल्ला केला. सोशल मीडियावर याबद्दलचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यात गोळीबारीचा आवाज येत आहे. त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. यावेळी पोलिसांनी अश्रू धुरांचा मार केला. जखमींना रुग्णालयात दाखल केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community