ट्रेनच्या बोगीत मुसलमान नमाज पठण करतात, मंत्रोच्चार करणाऱ्या माजी सैनिकाला मात्र मारहाण करतात

137

मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये लांबपल्ल्याच्या स्वर्ण जयंती एक्स्प्रेसमध्ये काही मुसलमान प्रवासी बोगीतील येण्या-जाण्याच्या मार्गावर बसूनच नमाज पठण करत असल्याचे दिसत होते. त्यावेळी प्रवाशांना जाण्यासाठी अडचणी येत होत्या, त्यानंतर तिथे उपस्थित माजी सैनिकाने मंत्रोच्चार करणे सुरु केले, त्यावेळी मात्र नमाज पठण करणाऱ्या मुसलमानांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर त्यांना मारहाण केली. परिणामी मारहाण करणाऱ्यांविरोधात मध्य प्रदेशच्या जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

https://twitter.com/iamdesinari/status/1594886852347322368?s=20&t=5rMar2mANnNIcOj1gwyx2A

जर ट्रेनमध्ये नमाज पठण होऊ शकते तर मंत्रोच्च्चार का नाही?  

घटनेच्या दिवशी माजी सैनिक विलास नाईक हे दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे ठाण्यावरून विशाखापट्टणमला जात होते. ट्रेन क्रमांक १२८०४ च्या स्पेलर क्लास एस-४ मध्ये ज्या डब्यात ते प्रवास करत होते त्या डब्यात काही मुस्लिमही प्रवास करत होते. यावेळी रेल्वेच्या डब्यात नमाज पठण करण्यात येत होते. त्यावेळी माजी सैनिक नाईक यांनी शौचालयाला जाण्यासाठी रस्ता मागितला तेव्हा नमाज पठण करणाऱ्या मुसलमानांनी त्यांना नकार दिला. त्यानंतर मात्र नाईक यांनीही त्याच ठिकाणी बसून मंत्रोच्चार करणे सुरु केले. त्यावेळी मात्र नमाज पठण करणाऱ्या मुसलमानानांनी यावर हरकत घेतली. ही घटना रविवार, २० नोहेंबर रोजीची आहे. त्यावेळी नाईक यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु झाली. तेव्हा पॅन्ट्री कारचे कर्मचारी तिथे आले. अर्ध्या तासाच्या वादानंतर हे प्रकरण हाणामारीवर पोहोचले. पॅन्ट्रीचे व्यवस्थापक हरवेश श्रीवास्तव यांनी सहकाऱ्यांना बोलावून नाईक यांना मारहाण केली. याप्रकरणी मध्य प्रदेशातील जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक नाईक यांनी जर ट्रेनच्या बोगीत नमाज पठण होऊ शकते तर मंत्रोच्चार का होऊ शकत नाही, असा सवाल करताच नाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली.

(हेही वाचा ‘या’ बँका देताहेत स्वस्त गृहकर्ज! कोणत्या बँकेत किती व्याजदर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.