मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) नरसिंहपूर (Narsinghpur) जिल्ह्यामध्ये सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक हबीब शाह खान (Habib Khan) मारहाण केली आहे. विद्यार्थ्यांनी ‘राधे राधे’ बोलल्यामुळे त्यांना ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी शाळेच्या व्यवस्थापकीय विभागात तक्रार केली. त्यानंतर मिशनरी शाळेच्या व्यवस्थापकीय समितीने दुर्लेक्ष केले. तसेच पीडितेच्या वडीलांनी जिल्हाधिकारी, खासदार आणि जिल्हा शिक्षा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.
( हेही वाचा : Vishva Hindu Parishad तर्फे १५ डिसेंबरला ‘शौर्य संचलना’चे आयोजन)
ऑपइंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नरसिंहपुर (Narsinghpur) जिल्ह्यातील ख्रिश्चन मिशनरीमद्वारे संचालित चावरा देवी विद्यापीठ स्कूलमध्ये घडले. दि. १० डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांची परिक्षा होती. त्यावेळी सातवी इयत्तेतील विद्यार्थी स्कूल बसने शाळेत पोहचला. त्याला कुणीतरी धक्का दिल्याने तो शिक्षक हबीबसमोर (Habib Khan) पडला. तेव्हा तो उठून राधे राधे म्हणाला. त्यानंतर शिक्षकाने त्याला मारहाण केली. तसेच त्याला अपमानित केले. त्यानंतर विद्यार्थ्याने परिक्षा दिली आणि घरी येऊन घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला.
विद्यार्थ्याचे कुटुंबीय दि. ११ डिसेंबर रोजी शाळेत पोहचले. त्यांनी शाळा व्यवस्थापक समितीकडे शिक्षकाची (Habib Khan) तक्रार केली. मात्र शाळा व्यवस्थापनाने प्रकरणाकडे दुर्लेक्ष केले. त्यानंतर जिल्हाधिकारी, खासदार आणि जिल्हा शिक्षा अधिकाऱ्याची कुटुंबियांनी भेट घेऊन याप्रकरणी तक्रार केली.
वृत्तसंस्थांनी जेव्हा शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क केला, तेव्हा प्राचार्य बाबू जोन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि शिक्षक दोघांचे हे म्हणणे ऐकून घेतले आहे. तसेच दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने प्रकरण मिटवले आहे. तसेच प्राचार्यांच्या मते, प्रकरणातील वाद मिटलेला आहे. दोन्ही पक्षांना कोणतीही तक्रार नाही. दरम्यान विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शाळेच्या प्रबंधकाने सांगितले की, ते तक्रार मागे घेतील.
दरम्यान नरसिंहपुर (Narsinghpur) जिल्ह्यातील एसपी मृहाकी डेका यानी सांगितले की, हे अदखलपात्र गुन्ह्याचे प्रकरण आहे. तरी हे प्रकरण परस्पर संवादातून सोडवण्यात आले आहे. मात्र रिपब्लिक भारतने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक हबीब शाह खान याला ५ दिवसासाठी निलंबित केले आहे. तसेच प्रकरणाचा पुढे तपास सुरु असल्याची ही माहिती आहे. तसेच मुस्लिम शिक्षक हबीब यांच्या या कृत्याचा स्थानिक लोकांनी विरोध केला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community