Muslim : लातूरमध्ये हिंदू जोडप्याला मारहाण करून मशिदीत धर्मांतर करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी मशिदीत जाऊन त्या जोडप्याला आणि चार मुसलमानांना ताब्यात घेतले.

387
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

लातूर येथे हिंदू जोडप्याला अमानुषपणे मारहाण करून त्यांना मशिदीत नेवून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारामुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ मुसलमानांना अटक केली आहे.

लातूर येथील उदगीर येथे एक हिंदू जोडपे सिनेमा पाहायला तेथील कल्पना थिएटरमध्ये गेले होते. त्यावेळी हिंदू मुलींनी हिजाब सारखे डोक्याला बांधले होते. म्हणून तिथे ४ मुसलमानांनी त्या हिंदू जोडप्याला मारहाण केली. पुढे त्या जोडप्याला जबरदस्तीने रिक्षात कोंबून मशिदीत नेऊन तिथे त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकाराची माहिती काही जणांना लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मशिदीत जाऊन त्या जोडप्याला आणि चार मुसलमानांना ताब्यात घेतले. पोलीस अधिक तपास करत आहे. यानंतर हिंदुत्वनिष्ठ लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान मुसलमानांनी पोलिसांच्या विरोधातच तक्रार केली आहे. पोलिसांनी ३९५ अ अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी ही कारवाई योग्य आहे, असे सांगितले.

(हेही वाचा The Kerala Story : इस्लामिक धर्मांतराबाबत विशाली आणि अनघा जयगोपाल यांनी सांगितली त्यांची ‘story’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.