-
ऋजुता लुकतुके
अमेरिकत गुंतवणुकीवर मिळणाऱ्या चांगल्या परताव्यामुळे परदेशी गुंतवणुकदारांनी आशिया आणि पर्यायाने भारतातील गुंतवणुकीमधून काढता पाय घेतला आगहे. त्यातच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणांमुळे ते इतर देशांतून होणाऱ्या आयातीवर आयात शुल्क वाढवत आहेत. तर रुपयाची अमेरिकन डॉलरसमोरची घसरणही थांबलेली नाही. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजार मागचे ६ महिने कोसळत आहे. ज्या लोकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे, त्यांची मालमत्ताही खाली आली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात सध्या एकूणच शेअर बाजार आणि त्याच्याशी जोडलेल्या गुंतवणुकीविषयी संभ्रमावस्था आहे. लोकांना एसआयपीद्वारे होणारी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थांबवावी का असाही प्रश्न पडला आहे. तज्ञांशी बोलून हिंदुस्थान पोस्टने या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. (Mutual Fund SIP)
शेअर बाजाराच्या घसरणीच्या काळात अनेक गुंतवणूकदारांच्या एसआयपीची आकडेवारी नफ्या ऐवजी तोट्यात असल्याचं दाखवतं. गुंतवणूकदारांनी अशा काळात तुम्ही एसआयपी थांबवल्यास तुम्ही तुमच्या वित्तीय ध्येयाच्या मार्गावरील प्रवास थांबवता. त्यामुळं तुम्ही गुंतवणूक सुरु ठेवली पाहिजे. नियमितपणे एसआयपीचे हप्ते भरले पाहिजेत. थेंबे थेंबे तळे साचे, असं देखील एसआयपी गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरतं. शिवाय जेव्हा म्युच्युअल फंडातील परतावा कमी होतो, तेव्हा नेट असेट व्हॅल्यू कमी होऊन तुमच्या गुंतवणुकीच्या मानाने जास्त युनिट तुम्हालाल मिळतात. त्यामुळे जेव्हा बाजार वर येतो, तेव्हा युनिट्स वाढून तुमचा परतावा आधीच्या तुलनेत वाढलेला दिसतो. (Mutual Fund SIP)
(हेही वाचा – Marine Lines परिसरातील ६ मजली इमारतीला भीषण आग)
जेव्हा शेअर बाजारात घसरण सुरु असते तेव्हा तुम्ही कमी किमतीमध्ये तुमचा पोर्टफोलिओ वाढवू शकता. बाजारातील घसरणीच्या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात अधिक परतावा देऊ शकते. तुम्ही एसआयपी बंद केल्यास तुम्हाला मिळणारा कम्पाऊंडिंगचा फायदा मिळत नाही. कुठल्याही गुंतवणुकीचा परतावा जास्त काळ गुंतवणुकीत राहिलात तर जास्त मिळतो. गेल्या ४० वर्षांचा विचार केला असता बीएसई सेन्सेक्समधील गुंतवणूकदारांना १६ टक्के सीएजीएआरनं परतावा मिळाला आहे. काही काळात कमी परतावा तर बऱ्याच कालावधीसाठी चांगला परतावा एसआयपीतून मिळाला आहे. मार्केट करेक्शनच्या काळात एसआयपी बंद केल्यास तुम्ही अतिरिक्त परतावा मिळण्यापासून वंचित राहू शकता. (Mutual Fund SIP)
जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता त्यावेळी ती प्रोफेशनल फंड मॅनेजर्सकडून आणि मजबूत वित्तीय आकडेवारीसह मॅनेज केली जाते. बाजारत घसरत असताना तुम्ही एसआयपी बंद करुन गुंतवणुकीचे दुसरे पर्याय स्वीकारल्यास तुम्हाला प्रोफेशनल फंड मॅनेजमेंटचे फायदे मिळणार नाहीत. बाजारातील अस्थिरतेच्या लाटेच्या स्थितीवर नियमित एसआयपीच्या माध्यमातून मात करता येऊ शकते. काही काळासाठी तुमची गुंतवणूक निगेटिव्ह दिसत असली तरी दीर्घकाळासाठी तुम्हाला चांगला परतावा एसआयपीच्या माध्यमातून मिळू शकतो. (Mutual Fund SIP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community