Drone Attack :अरबी समुद्रात हल्ला झालेले एमव्ही केम प्लुटो जहाज मुंबई बंदरात दाखल

सौदी अरबिया तून मंगळुरूला येणाऱ्या एमव्ही केम प्लुटो या व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता. या जहाजात २१ भारतीय होते. हे जहाज सोमवारी( २५ डिसेंबर) मुंबई बंदरात पोहचले आहे.

272
Drone Attack :अरबी समुद्रात हल्ला झालेले एमव्ही केम प्लुटो जहाज मुंबई बंदरात दाखल
Drone Attack :अरबी समुद्रात हल्ला झालेले एमव्ही केम प्लुटो जहाज मुंबई बंदरात दाखल

भारतात येत असताना अरबी समुद्रात (Arbian Sea)हल्ला झालेले जहाज मुंबईच्या बंदरावर पोहचले आहे. दोन दिवसांपूर्वी (२३ डिसेंबर) सौदी अरबिया तून मंगळुरूला येणाऱ्या एमव्ही केम प्लुटो (MV chem pluto) या व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता. या जहाजात २१ भारतीय होते. हे जहाज सोमवारी( २५ डिसेंबर) मुंबईत बंदरात पोहचले. (Drone Attack)

सौदी अरबिया तून मंगळुरूला येणाऱ्या एमव्ही केम प्लुटो या व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता.या जहाजावर लायबेरीयचा ध्वज होता. या जहाजाला इंडियन कोस्ट गार्डच्या जहाजमार्फत एस्कॉर्ट करण्यात आल. इंडियन कोस्ट गार्डच्या सहाय्याने मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात यश आल आहे. (Drone Attack)

 

(हेही वाचा : Mumbai Airport : फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या २७६ भारतीयांची सुटका, ४ दिवसांनंतर विमान मुंबईत परतले)

हल्ल्याची सखोल चौकशी नौदल पथक करणार 
संरक्षण आधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार एमव्ही दिलेल्या माहितीनुसार, एमव्ही केम प्लुटो जहाजावर संशयित ड्रोन हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी नौदल पथक करत आहे. तसेच याचे किती नुकसान झाले आहे याचा तपासही पथक करत आहे. भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार या जहाजात २१ भारतीय आणि एक व्हिएतनामी नागरिक होते. त्यावर  संशयास्पद ड्रोन हल्ला करण्यात आला होता. ICGS विक्रम भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आल होत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.