‘एमव्ही गंगा विलास’ रिव्हर क्रुझ २८ फेब्रुवारीला दिब्रुगडला पोहोचणार! ५० दिवसांचा प्रवास पूर्ण होणार

128

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जानेवारी रोजी वाराणसी इथे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जगातल्या सर्वांत लांबवरच्या नदी प्रवासाला निघालेली ‘एमव्ही गंगा विलास’ रिव्हर क्रुझ (नदी पर्यटन जहाज) 28 फेब्रुवारी रोजी दिब्रुगढ इथे आपला प्रवास पूर्ण करेल. त्याच दिवशी दिब्रुगढमध्ये भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाद्वारे (IWAI) स्वागत समारंभ आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, शिष्टमंडळाचे प्रतिनिधी आणि भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहतील.

( हेही वाचा : बालाकोट एअर स्ट्राईकला ४ वर्ष पूर्ण! भारताने असे उद्धवस्त केले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळ)

 ‘एमव्ही गंगा विलास’ने भारत आणि बांगलादेशला जगाच्या नदी पर्यटनाच्या नकाशावर आणले आहे. त्यामुळे भारतीय उपखंडातील पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी एक नवे अवकाश खुले झाले आहे, असे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.