मविआ मुंबईत सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी 10 वाजल्यापासून बंद रहाणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत (Gateway of India) मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाही. (MVA Aandolan News)
(हेही वाचा – Raj Thackeray: १६ वर्षांपूर्वी दिलेलं चिथावणीखोर भाषण राज ठाकरेंना भोवलं!)
महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया सकाळी दहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे . गेट ऑफ इंडिया या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ मविआ निषेध व्यक्त करणार आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भाजपचे आंदोलनातूनच उत्तर
मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी मविआ (Maha Vikas Aghadi) १ सप्टेंबर रोजी जोडे मारो आंदोलन करणार आहे. मविआच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार आहे. मविआच्या निषेधार्थ महायुतीने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली. मविआच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून शिवरायांच्या पुतळ्यासमोर राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. सिंधुदुर्ग घटनेबद्दल माफी मागून सुद्धा महाविकास आघाडी आंदोलन करत आहे त्याचा निषेधार्थ आज सकाळी 9 पासून राज्यभर आंदोलन केली जाणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन होणार आहे. सिंधुदुर्ग नारायण राणे, रत्नागिरीत रवींद्र चव्हाण, लातूर रावसाहेब दानवे, संभाजीनगर अतुल सावें, भागवत कराड, ठाण्यत निरंजन डावखरे, पालघरात हेमंत सावरा, तर मुंबईत प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन केली जाणार आहेत. (MVA Aandolan News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community