Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये मागील शुक्रवारी २८ मार्चला झालेल्या भूकंपात (Earthquake) मोठी आर्थिक हानी झाली असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, म्यानमारच्या सत्ताधारी लष्कराने देशातील सशस्त्र गटांबराेबर सुरु असलेल्या संघर्षावर तात्पुरती बंदी जाहीर केली आहे, असे वृत्त ‘AFP’ने दिले आहे. (Myanmar Earthquake)
Myanmar’s junta chief to head to Bangkok summit as quake toll surpasses 3,000.
Many nations have sent aid and rescue workers to Myanmar, but heavily damaged infrastructure and patchy communications – as well as the civil war – have hampered effortshttps://t.co/lhpoPjNlRB pic.twitter.com/riy3VPzWWc
— AFP News Agency (@AFP) April 3, 2025
भूगर्भ शास्त्रज्ञांच्या (Underground scientist) मते, हा भूकंप म्यानमारमध्ये गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठा होता. या भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की, केंद्रबिंदूपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या बँकॉकमधील (Bangkok) इमारतींचेही मोठे नुकसान झाले. मंडालेमध्ये एक प्राचीन बौद्ध पगोडा पूर्णपणे कोसळून त्याचा शब्दश: ढिगारा झाला आहे. म्यानमारच्या सर्वाधिक प्रभावित मंडाले प्रदेशात (Mandalay region) किमान 694 लोकांचा मृत्यू झाला असून, जवळपास 1,700 लोक जखमी झाले आहेत.
(हेही पहा- Solapur जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; जमीन हादरली, जाणून घ्या तीव्रता किती होती? )
देशातील गृहयुद्धात तात्पुरती युद्धबंदी
७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात आतापर्यंत ३००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बुधवारी २ एप्रिलला रात्री उशिरा सरकारी टेलिव्हिजन ‘एमआरटीव्ही’वर युद्धबंदी जाहीर केली. शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे बाधित झालेल्या लोकांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी २२ एप्रिलपर्यंत लढाई थांबवली जाईल. लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या सशस्त्र गटांनी जाहीर केलेल्या एकतर्फी तात्पुरत्या युद्धबंदीनंतर ही घोषणा करण्यात आली. लष्करी राजवटीला (Military rule) विरोध करणाऱ्या सशस्त्र गटांनी राज्यावर हल्ला करणे आणि पुन्हा एकत्र येणे टाळावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मान्यमार लष्कराने दिला आहे. म्यानमारच्या लष्कराने २०२१ मध्ये आंग सान सू की यांच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता हस्तगत केली. आता देशात लष्करी राजवटीविरोधात सशस्त्र प्रतिकारात रूपांतर झाले आहे.
दरम्यान, भारतासह अनेक राष्ट्रांनी म्यानमारमध्ये मदत आणि बचाव कर्मचारी पाठवले आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पायाभूत सुविधा आणि तुटलेल्या दळणवळणामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तसेच गृहयुद्धामुळे (Myanmar Civil War) मदत कार्याला अडथळा निर्माण होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community