
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी तिरुमला (Tirumala Temple) येथील भगवान श्री वेंकटेश्वर मंदिरात फक्त हिंदूंनीच (Hindu) काम करावे असे म्हटले आहे. इतर धर्म मानणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानाने इतर ठिकाणी बदली केली जाईल, असेही नायडू (N. Chandrababu Naidu) म्हणाले. एन चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांचे नातू एन देवांश नायडू यांच्या वाढदिवसाला मंदिरात दर्शनानंतर त्यांनी हे विधान केले.
( हेही वाचा : Bangladeshi Infiltrators : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला अटक)
काही महिन्यांपूर्वीच, तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirumala Tirupati Devasthanams) बोर्डाने ‘गैर-हिंदू धार्मिक कार्यात’ सहभागी झाल्याबद्दल १८ कर्मचाऱ्यांची बदली केली होती. नायडू (N. Chandrababu Naidu) म्हणाले, “जर ख्रिश्चन किंवा मुस्लिम बंधू-भगिनींना हिंदू ठिकाणी काम करायचे नसेल तर त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवले जाईल.” (Tirumala Temple)
तिरुपतीमध्ये ३५ एकर जमिनीवर हॉटेल बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची घोषणाही नायडू यांनी केली. ही जमीन मागील वायएसआर काँग्रेस सरकारने देवलोक, एमआरकेआर आणि मुमताज बिल्डर्सना (Mumtaz Builders) दिली होती. ते म्हणतात की मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते, कारण लोकांनी आलिशान हॉटेल्सना तीव्र विरोध केला होता. याशिवाय, त्यांनी सांगितले की राज्यातील अनेक गावांमध्ये लोकांना त्यांच्या परिसरात वेंकटेश्वराचे मंदिर हवे आहे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाईल, जो निधी उभारेल. नायडू म्हणाले, “एनटी रामाराव यांच्या काळात अन्न दानम सुरू झाले होते, आता प्राण दानम सुरू झाले आहे. तिसरे पाऊल म्हणून, आम्ही मंदिर बांधू.” (Tirumala Temple)
मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी देशभरातील राजधान्यांमध्ये भगवान वेंकटेश्वराची मंदिरे बांधण्याची योजना जाहीर केली. यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली जातील. दि. १ फेब्रुवारी रोजी बदली झालेल्या १८ कर्मचाऱ्यांपैकी ६ जण टीटीडी शाळांमधील शिक्षक होते. उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये एक उपकार्यकारी अधिकारी (कल्याण), सहाय्यक कार्यकारी अधिकारी, सहाय्यक तांत्रिक अधिकारी (विद्युत), वसतिगृह कर्मचारी, दोन इलेक्ट्रिशियन आणि दोन परिचारिका यांचा समावेश होता. (Tirumala Temple)
“सर्वांना त्यांच्या संमतीने बदली करण्यात आले. आता, तिरुमलामध्ये (Tirumala Temple) एकही बिगर-हिंदू कर्मचारी नाही,” असे टीटीडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. टीटीडी बोर्डाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये बिगर हिंदूंच्या बदलीची आणि राजकीय वक्तव्यांवर बंदी यावर चर्चा करण्यात आली. भाविकांच्या भावना आणि मंदिराची परंपरा, आस्था लक्षात घेऊन नायडू यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community