N. D. Studio Bankruptcy : एन. डी. स्टुडिओ दिवाळखोरीत; सर्वोच्च न्यायालयाने नयना देसाई यांची याचिका फेटाळली

177
N. D. Studio Bankruptcy : एन. डी. स्टुडिओ दिवाळखोरीत; सर्वोच्च न्यायालयाने नयना देसाई यांची याचिका फेटाळली
N. D. Studio Bankruptcy : एन. डी. स्टुडिओ दिवाळखोरीत; सर्वोच्च न्यायालयाने नयना देसाई यांची याचिका फेटाळली

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मालकीच्या एन.डी. वर्ल्ड स्टुडिओ दिवाळखोरीत काढण्याचा राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाचा (एनसीएलटी) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. (N. D. Studio Bankruptcy) तसेच, या एनसीएलटीच्या निर्णयाच्या पुनर्विलोकनासाठी देसाई यांच्या पत्नी नयना यांनी केलेली याचिका फेटाळली. एनसीएलटीच्या १ ऑगस्टच्या आदेशाला नयना यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. एनसीएलटीने २५ जुलै रोजी देसाई यांच्या कंपनीविरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईस मंजुरी दिली होती.

(हेही वाचा – Ceremony of Tigress Calf : बछड्याच्या नामकरण सोहळ्यालाही राजकीय रंग, ‘आदित्य’ नावाला सुधीर मुनगंटीवारांचा विरोध)

एनसीएलटीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण सापडत नाही. (N. D. Studio Bankruptcy) त्यामुळे आम्ही ही याचिका फेटाळत असल्याचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन.  भाटी यांच्या खंडपीठाने नयना यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका फेटाळून लावताना नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे, नितीन आणि नयना देसाई यांच्या एन.डी. वर्ल्ड कंपनीच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि ३०० कोटी रुपयांचे कर्ज वसुलीची कारवाई एडलवाईस अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू केली जाईल.

थकीत कर्जामुळे नितीन देसाई यांची आत्महत्या 

एनसीएलटीच्या दिवाळखोरीच्या कारवाईच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ ऑगस्ट रोजी नितीन देसाई हे त्यांच्या कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात गळफास घेऊन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्नही झाले होते. आत्महत्येपूर्वी, देसाई यांनी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचे तपशीलवार ध्वनिचित्रफिती तयार करून त्या मागे ठेवल्या होत्या.

नोव्हेंबर २०१६ मध्ये देसाई यांच्या कंपनीने ईआरसीकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ईएफएसकडून पुन्हा अतिरिक्त ३५ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले. जानेवारी २०२० पासून कर्जाचे हप्ते थकले होते. त्यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटींची थकबाकी होती. देसाई यांना कर्जवसुलीसाठी छळले गेल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करून नयना यांनी याबाबत ४ ऑगस्ट रोजी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर, एडलवाईस फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे (ईएफएस) चेअरमन रशेष शहा यांच्यावर देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय, एडलवाईस अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (ईएआरसी) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज कुमार बन्सल आणि कंपनीचे अधिकारी स्मित शाह, केयूर मेहता, तसेच एनसीएलटीने एन.डी. स्टुडिओ दिवाळखोरीशी संबंधित प्रकरणात नियुक्त केलेले जितेंद्र कोठारी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला. (N. D. Studio Bankruptcy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.