शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन व फेरमूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. मात्र, वेळावेळी निर्देश देऊनही अद्याप काही महाविद्यालयांनी हे मूल्यांकन करून घेतलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर येत्या 31 मार्च 2023 पर्यंत ‘नॅक’ मूल्यांकन करणे अनिवार्य आहे अन्यथा येत्या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
( हेही वाचा : ‘मविआ’चा आदेश अमोल कोल्हेंनी झुगारला; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला लावली हजेरी)
नॅक मूल्यांकन बंधनकारक
राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांना मूल्यांकन व फेरमूल्यांकन अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये अपेक्षित वाढ होऊन उच्च शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचे संवर्धन व्हावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नॅक मूल्यांकन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार उच्च शिक्षण विभागानेही वेळोवेळी शासकीय व अशासकीय महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्याबाबत सूचित केले आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि त्याची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि त्याची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन व फेरमूल्यांकनाचे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित केले आहे.
३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून शैक्षणिक गुणात्मक दर्जा वाढीसाठी नॅक मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. ज्या महाविद्यालयांनी हे नॅक मूल्यांकन करून घेतलेले नाही त्या सर्व महाविद्यालयांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत नॅक मूल्यांकन करून घेणेय बंधनकारक असणार आहे.
Join Our WhatsApp Community